Ticker

6/Breaking/ticker-posts

राजेंद्र बुंदेले यांना राज्यस्तरीय डॉ. रोहिदास वाघमारे स्मृती गौरव पुरस्कार मुंबई येथे प्रदान






राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने ‘डॉ. रोहिदास वाघमारे स्मृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार’ नगर येथील  महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांना महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी  राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार, नगरसेविका सौ. संध्या दोषी, माजी महापौर व प्रदेशाध्यक्षा सौ. स्नेहल आंबेकर,  मुंबई अध्यक्ष राजेश खाडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती संगीता वाघमारे आदी.

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर :- राष्ट्रीय चर्मकार महासंघ मुंबई प्रदेशच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ व्या जयंतीनिमित्त आयेाजित समाज मेळाव्यात डॉ. रोहिदास वाघमारे स्मृती गौरव पुरस्कार  नगर येथील  महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांना  महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून आठ विभागातून वितरित करण्यात येणार्या नाशिक विभागातून नगरचे श्री. राजेंद्र बुंदेले यांना रोख तीन हजार, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल श्रीफळ देऊन  गौरविण्यात आले. राजेंद्र बुंदेले हे गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहेत. चर्मकार समाजाबरोबरच सर्वसमावेशक असे त्यांचे कार्य पाहून त्यांची सदरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 


यावेळी   याप्रसंगी  राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार, नगरसेविका सौ. संध्या दोषी, माजी महापौर व प्रदेशाध्यक्षा सौ. स्नेहल आंबेकर, राष्ट्रीय सचिव उमाकांत डोईफोडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, मुंबई अध्यक्ष राजेश खाडे, मुंबई निरीक्षक राजू नेटके व राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती संगीता वाघमारे यांच्या उपस्थितीत  सन्मानीत करण्यात आले. संभाजी आहेर, कैलास गांगर्डे, संतोष उदमले, विशाल बेलपवार, किरण हंकारे, राजेश कचकायल आदींसहित शेकडो समाज बांधव उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे आयोजन पंढरीनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दादाभाऊ माने, बाबू गोरे, संतोष डावरे, रामदास सातपुते, रमेश काटकर, सूर्यकांत कांबळे, दत्ता शिखरे,  श्रीम. संगीता रोहिदास वाघमारे, डॉ. शांताराम पां. कारंडे यांनी केले होते. सूत्रसंचालन डॉ. शांताराम कारंडे व उमाकांत डोईफोडे यांनी केले. तर आभार राजू नेटके यांनी मानले. 




 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या