Ticker

6/Breaking/ticker-posts

बिबट्या आला रे..शोधासाठी वन विभागाचे पथक सज्ज

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर : आदर्शगाव हिवरे बाजार, टाकळी खातगावातील हद्दीवरील पादीरवाडी तलाव भागात गुरूवारी (ता. 10) बिबट्या आल्याची माहिती भागातील शेतकऱ्यांनी दिली असून  या वार्तेने आसपासच्या भागातील नागरिकांची भितीने ग़ाळ्ण उडाली आहे.  खरच बिबट्या आला आहे का? याची खात्री करण्यासाठी वन विभागाचे पथक शुक्रवारी (ता.11) टाकळी खातगावपासून पाहणी करणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी दिली.

 याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरूवारी (ता. 10) सायंकाळी टाकळी खातगाव येथील प्रगतशील शेतकरी अविनाश शिंदे हे पादीरवाडी भागातील शेतात मालवाहतूक करणारे वाहनातून गेले होते. ते वाहनातून खाली उतरल्यानंतर काही अंतरावर त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी वाहनात बसून बिबट्याचे फोटो काढले आहेत. हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. या भागातील अन्य काही शेतकऱ्यांनी बिबट्याचा आवाज ऐकलेला आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाचे पथक या भागात येऊन बिबट्याचे ठसे आहेत का? याची पडताळणी करणार आहे. बिबट्याचे ठसे असल्यास या भगात पिंजरा लावण्यात येणार आहे. सध्या पिके जोमात असल्याने पाणी देण्यासाठी शेतकर्याना रातीचे भरणे करावे लागते. बिबट्याच्या भितीने भरण्यावर पाणी सोड्ण्याची वेळ आली आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या