स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना
गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाल्याने त्यांनी नेवासा परिसरात फरार व स्टॅण्डींग
वॉरंट असलेल्या आरोपींचा शोध घेत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील
अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश
दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे , पोहेकॉ मनोहर गोसावी ,पोहेकॉ संदीप घोडके
,पोना लक्ष्मण खोकले पोना शंकर चौधरी ,पोना रविकिरण
सोनटक्के ,पोना देवेंद्र शेलार , पोकॉ सागर ससाणे , पोकॉ आकाश काळे , जालिंदर माने , रोहित येमुल व पोहेकॉ
बबन बेरड नेवशात सापळा लावला. सचिन वसंतराव कोळेकर (रा . मक्तापुर , ता . नेवासा) याच्याकडे
एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतूसे असे एकूण २६,००० / - रु . किं .
गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. तत्परतेने पोलिसानी
त्यास जेरबंद केले.
0 टिप्पण्या