Ticker

6/Breaking/ticker-posts

आध्यात्मिक वारसा तरुण पिढीने चालविण्याची गरज- आमदार जगताप


संत भगवान बाबा व वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्याची सांगतानगर ः-विचार कधी थांबत नाहीत, भगवान बाबांच्या विचारांचा, अध्यात्मिक धर्माचा वारसा तरुण पिढीने पुढे चालविण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सेवाभावी प्रतिष्ठान सप्ताहाच्या माध्यमातून संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांचे विचार जनमानसात रुजवत आहे. तरूण पिढीने हा अध्यात्मिक वारसा पुढे नेटाने चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
    संत भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठानच्यावतीने सारसनगर येथे संत भगवान बाबा व वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्याची सांगता  जगताप यांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, रोहिदास कर्डिले, शंकर भारती, हभप अमोल महाराज, संत भगवान बाबा भक्त मंडळ उपस्थित होते.
 गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या या सप्ताहांतर्गत विविध नामांकित महाराजांचे किर्तने, प्रवचने झाली. नित्यनियमाने हरिपाठ, परिसरातील महिला भजनी मंडळाचे भजने आदि धार्मिक कार्यक्रम झाले. सप्ताहाची सांगता अमोल महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या