Ticker

6/Breaking/ticker-posts

जांभेकरांची जयंती पत्रकारांसाठी आत्मचिंतनाचा दिवस- अनिरूध्द देवचक्के

   








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी / टाकळी मनुर :     बाळशास्त्री  जांभेकरांची जयंती हा केवळ पत्रकार दिन म्हणून साजरा न करता पत्रकारांसाठी तो आत्मचिंतनाचा दिवस असावा. समाजात जसे अनेक परिवर्तने झाली तशी परिवर्तने पत्रकारिता क्षेत्रातही झाल्याने आजची पत्रकारिता म्हणजे कारकुनी ठरत आहे.  संवाद साधण्याची क्षमता व विषय  नीटपणे समजून घेण्याच्या अभावामुळे आजची पत्रकारिता विषयांतर होऊन बसली असून पत्रकारांच्या लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब उमटण्याऐवजी व्यक्तीकेंद्रित होणाऱ्या बातमीदारीमुळे बातम्यांचा दर्जा खालावत चालल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार व संपादक अनिरुद्ध देवचक्के यांनी व्यक्त केली.

 

येथील संस्कार भवनमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस  अँड. प्रतापराव ढाकणे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार दिनानिमित्त शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अॕड. प्रतापराव ढाकणे होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यश शिवशंकर राजळे ,नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, दिगंबर गडे, हुमायून आतार, योगेश रासने, वैभव दहिफळे, डॉ .दीपक देशमुख, डॉ.राजेंद्र खेडकर, किरण खेडकर, युवकचे तालुकाध्यश महारुद्र कीर्तने, पांडुरंग शिरसाट, चांद मणियार ,सागर शिरसाट,शरद सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर शर्मा, नंदकुमार दायमा, बजरंगलाल बियाणी, अविनाश मंत्री, जनार्दन लांडे,शाम पिरोहित,शेवगाव प्रास क्लबचे अध्यक्ष कैलास बुधवंत, पाथर्डी प्रास क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर आदी उपस्थित होते.




 देवचक्के म्हणाले, लिहिण्यापूर्वी पत्रकारांनी लोकं वाचण्याची सवय लावावी. अभ्यास ,वाचन,चिंतन करून पत्रकारांनी कोणताही विषय हाताळल्यास ती बातमी परिणामकारक ठरेल .आज पत्रकारांना मोठेपणा मिरवून घेण्याची सवय जडल्याने प्रत्येक समारंभात मान-सन्मानासाठी ते पुढे सरसावतात .विचारपूर्वक बातमीदारी करणारा खरा पत्रकार असतो. आधुनिक काळात कॉपी –पेस्ट  पत्रकारितेने धुमाकूळ घातला असून जो समाजासाठी व पत्रकारिता क्षेत्रासाठी घातक ठरणारा आहे. अहंकारामुळे पत्रकारांचे व्यक्तिमत्व पोखरले जात आहे. पत्रकार हा सदैव ज्वलंत व धगधगता असला पाहिजे म्हणजे तो आततायीपणा करणारा नसावा. संवाद शैलीतून विषय काढत त्याच्या खोलीत जाऊन लोकहिताचे वृतांकन करणे गरजेचे आहे. लोकांचा संघर्ष लिखाणातून समाज व व्यवस्थेसमोर आणावा. न्यूज पोर्टलमुळे दर्जाहीन पत्रकारिता फोफावली असून यापुढील काळात जो विचारपूर्वक बातमी लिहील तोच या क्षेत्रात टिकून राहील.


 अँड. प्रतापराव ढाकणे म्हणाले, ब्रिटीशांच्या बंधनातही  बाळशास्त्री जांभेकरानी लोकांवर होणारा अन्यायाविरोधात आपल्या लेखणीतून वाचा फोडली. त्यातून स्वातंत्र्य चळवळीलाही बळ मिळाले . आज पत्रकारिता क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली त्यामुळे बातम्यांचे मूल्य कमी होतेआहे हे माझ्यासारख्या वाचकाला खटकते. छापील वृत्तपत्राना कोणताच पर्याय नाही हर लक्षात घेता प्रिंट मीडियात काम करणाऱ्यांची  जबाबदारी त्यामुळे अधोरेखित होते. आजही लोकांचा वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांवरच अधिकचा विश्वास आहे. वाचक समृद्ध व समाज जागृत झाला पाहिजे अशी पत्रकरिता अपेक्षित आहे. विषय व घटनांमधील बारकावे लक्ष्यात घेऊन प्रत्येक विषयाची बातमी केल्यास ति खरी शोधपत्रकारिता ठरेल जी आज काही प्रमाणात हरपली आहे.प्रश्न व समस्या खूप आहेत. मात्र शोधून काढत होणार्या अन्यायावोरोधात वाचा फोडून लोकांना न्याय मिळवून देणे पत्रकारांचे आद्य कर्तव्य असून त्यासाठी जुन्या पिढीतील पत्रकारांचे मार्गदर्शन नवीन प्त्रक्र्णी घ्यावे असे शेवटी ढाकणे म्हणाले. प्रास्ताविक नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांनी केले तर सूत्रसंचालन शिवाजी मरकड यांनी केले. आभार डॉ. राजेंद्र खेडकर यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या