Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डीत मध्य रात्रीपासून दरोडेखोरांचा धुमाकूळ..!

  नागरिकांना जबर मारहाण ..तालुक्यात घबराटलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी: पाथर्डीतिल चितळे वस्तीवर अज्ञात सहा दरोडे खोरांनी दरोडा टाकून तीन वयोवृद्धाना जबर मारहाण केली असून लिंबाजी नाथ चितळे वय ६५,बाबुराव गुणाजी उळगे वय ६५,कमलबाई लिंबाजी चितळे वय ५८ (सर्व रा. शेवगावरोड,चितळेवस्ती,पाथर्डी) यांना कुऱ्हाडीने  मारहाण करण्यात आली. जखमींच्या डोक्याला जबर मार लागला असून हात फॅक्चर झाले आहेत. यातील लिंबाजी नाथ चितळे हे गंभीर जखमी होऊन अत्यवस्थेत आहे.


 शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा दरोडे खोरानी दरोडा टाकला.प्रथम दरोडे खोरांनी बाहेर झोपलेल्या कमलबाई चितळे यांना जबर मारहाण केली.त्यांनतर घराचा दरवाज्या तोडून घरात झोपलेल्या लिंबाजी चितळे,बाबुराव गुणाजी उळगे,लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी व बाबुराव यांना जबर मारहाण केली.लक्ष्मीबाई उळगे वय ६०( रा .शेवगावरोड,चितळेवस्ती,पाथर्डी) यांनी त्यांच्याकडील गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र,कानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांना काढून दिले.त्यांना मात्र दरोडे खोरांनी मारहाण केली नाही. 

या घटनेत सोन्याच्या दागिन्यांसह २० हजारांची रोख रक्कम आरोपींची लांबवली आहे. या दरोडमुळे तालुक्यात घबराट पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या