Ticker

6/Breaking/ticker-posts

राजकारण पेट्ले, दरेवाडीत दोन गटात तुफान राडा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

दरेवाडी : नगर तालुक्यातील दरेवाडी निवडनुकीवरुन सरपंच व उपसरपंचाच्या गटात तुफान हाणामारी झाली आहे. त्यामुळे गावात निरव शांतता पसरली आहे. दरेवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या भावजय सरपंच तर भाजपाचेच अनिल करांडे उपसरपंच आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात राजकीय वाद सुरू झाले. या वादाचे पर्यावसन सोमवारी (दि.13) जोरदार राड्यात झाले.

सकाळी वाकोडी फाट्यावर वाद झाल्यावर दोन्ही गट भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता तेथेही दोन्ही गटात पोलिसांसमोर चांगलीच वादावादी झाली. एकमेकांना शिवराळ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांनाही अरेरावी करण्यात आली. या हाणामार्‍या व वादंगाप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत. 

 यातील आरोपी वैभव निंबाळकर हा फिर्यादी युवतीशी पाठलाग करुन छेडछाड करीत होता. त्यास आरोपी मच्छिंद्र बेरड व सुभाष बेरड हे प्रोत्साहन देत होते. फिर्यादीस झालेल्या छेडछाडीबाबत फिर्यादी व साक्षीदार हे वाकोडी फाट्यावर सुभाष बेरड यांच्या दुकानात गेले असता तेथे आरोपींनी एकत्र येवून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रोडने मारहाण केली. तसेच साक्षीदार असलेल्या दोन महिलांना मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून नेले. मारहाण करणारा आरोपी विक्रम भोगाडे यास मच्छिंद्र बेरड व आशा निंबाळकर या प्रोत्साहन देत होत्या तसेच याबाबत फिर्याद देण्यासाठी पोलिस स्टेशनला आल्यानंतर पोलिस स्टेशनच्या आवारातही फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 या दोन परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात केलेल्या राड्याप्रकरणी पोलिसांच्यावतीने दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल झाले. दरम्यान या राड्यामुळे दरेवाडी गावात वातावरण तणाव पूर्ण झाले असून तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करन्यात आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या