Ticker

6/Breaking/ticker-posts

महानगरपालिकेत महाविकास आघाडीचीच सत्ता राहील - आ.संग्राम जगताप

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, त्यामुळे येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडीचाच उमेदवार असणार असून, तो निवडून येण्यासाठी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करणार आहेत. नगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असून आगामी काळातही ती कायम राहील असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यानी केले.

प्रभाग क्र.9 क चे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती अविनाश घुले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रा.माणिक विधाते, धनंजय जाधव, आरिफ शेख, गणेश कवडे, सचिन शिंदे, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड, अभिजित खोसे, दगडू पवार, गौरव ढोणे, अरविंद शिंदे, दिपक सूळ, रामचंद्र दिघे, रवी चव्हाण, कैलास शिंदे, सारंग पंधाडे, निर्मला धुपधरे, छाया तिवारी, अरुणा गोयल, दिपक कावळे आदिंसह राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

   .

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या