Ticker

6/Breaking/ticker-posts

राम शिंदेंची नौटंकी- आ. रोहित पवार

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कर्जत : काल उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या काही विद्यमान नगरसेविकांनी अचानक उमेदवारी अर्ज काढून घेतले. त्यामुळे संतप्त राम शिंदे यानी हे आमदार पवार यांचे दबावतंत्र असल्याचा आरोप केला त्यास पवार यानी लोकशाही मार्गाने निवडणूक लढवुन सर्वच्या सर्व जागा जिंकू असे सांगुन, ही राम शिंदेंची नौटंकी असल्याचे उत्तर दिले.

पुढे आमदार पवार म्हणाले की, भाजपचे नगरसेवक उमेदवारी अर्ज काढण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या परिसरात भाजपचे 200 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिने ते चारच लोक होते त्यामुळे दडपशाही कोण करेल हे लक्षात येते. एवढेच नव्हे तर आणखी दोन भाजपाचे उमेदवार अर्ज काढण्यासाठी त्या ठिकाणी आले होते परंतु त्यांना येण्यास उशीर झाला. जर मला दडपशाही करावयाची असती तर मी अधिकाऱ्यांना सांगून देखील दोन उमेदवारी अर्ज काढून घेण्यासाठी सांगितले असते परंतु मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे यामुळे राम शिंदे हे अशा पद्धतीने का करत आहेत हे त्यांनाच माहिती मात्र मला हे योग्य वाटत नाही, त्यांनी केलेला आरोप हा नैराश्यातून केलेला आहे.

प्रभाग दोन मध्ये भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका नीता आजिनाथ कचरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार लंकाबाई देविदास खरात या बिनविरोध निवडून आल्या आहेत. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक जागा बिनविरोध करीत खाते उघडले ,तर दुसरीकडे महविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र तर शिवसेना स्वतंत्र लढत आहे.

अर्ज मागे घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयामध्ये आल्या त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठा गोंधळ उडाला. यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी देखील झाली. माजी मंत्री राम शिंदे हे देखील त्या ठिकाणी आले व त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले . या गोंधळानंतर देखील उमेदवारी अर्ज काढण्यासाठी अनेक जण एकमेकांच्या मिनतवाऱ्या त्या ठिकाणी करत होते. वेळ संपत आल्यावर देखील काही उमेदवारी अर्ज काढण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळ संपल्यामुळे आता कोणाचाही उमेदवारी अर्ज माघारी घेतला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली त्यानंतर अनेक जण त्या ठिकाणाहून निघून गेले.

 कर्जत नगरपंचायत मध्ये महाविकास आघाडी एकत्र येणार का याविषयी उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी झाली दोन जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आले असून. दहा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊन एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या