Ticker

6/Breaking/ticker-posts

आगामी काळात महापालिकेत भाजपाची सत्ता - खा. सुजय विखे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर : गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत भाजपाचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या काळात केंद्र शासनच्यावतीने विविध योजना नगर शहरात राबविण्यात आल्या. अमृत योजना, उड्डाणपुल यासारखी मोठी कामे झाल्याने शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे. अशीच कामे यापुढेही होणार आहेत, 2023 साली होणार्‍या महानगरपालिकाच्या निवडणुकीत भाजपा सर्व जागा स्वतंत्रपणे लढवून सत्ता मिळवेल असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

प्रभाग क्र.9 च्या पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ खा.डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, अ‍ॅड.अभय आगरकर, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, कॅन्टों.बोर्ड उपाध्यक्ष वसंत राठोड, अ‍ॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदे, नरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दहिंडे, अजय चितळे, सुरेखा विद्ये, शुभांगी साठे, अंजली वल्लाकट्टी, संतोष गांधी, कालिंदी केसकर, महेश तवले, कुसूम शेलार, लिला आग्रवाल, दिलीप भालसिंग, जगन्नाथ निंबाळकर, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, सुधीर मंगलाराम्, प्रशांत मुथा, सुमित बटूळे, बंट्टी ढापसे, शशांक कुलकर्णी, बबन गोसकी आदि उपस्थित होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या