Ticker

6/Breaking/ticker-posts

आपण एक विट लावणार असाल तर विखे कुटूंब दहा विटा लावेल – खा. डॉ सुजय विखे

 लोकनेते गोपीनाथराव मुंडे शैक्षणिक संकुल  व धर्मादाय हॉस्पिटलचे  भूमिपूजन




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 


पाथर्डी (खरवंडी) : लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु होणाऱ्या धर्मादाय हॉस्पीटल साठी आपण एक विट लावणार असाल तर विखे कुटूंब दहा विटा लावेल असा शब्दांत नियोजित हॉस्पीटल ला सर्वपरिने  मदत करण्यात विखे कुटूंबाचा पुढाकार राहणार असल्याचा निर्वाळा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यानी दिला.

 

पाथर्डी तालुक्यातील येळी येथे संत भगवान बाबा ग्रामविकास संस्था संचालित येळी या संस्थेचे  लोकनेते गोपीनाथराव मुंडे शैक्षणिक संकुल   व धर्मादाय हॉस्पिटलचे  भूमिपूजन खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळीते बोलत होते यावेळी  आमदार मोनिका राजळे समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरिकर  तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री येळेश्वर सस्थांन चे महंत रामगिरी महाराज भाजपा जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे  उपस्थित होते.  

 

यावेळी आमदार राजळे म्हणाल्या की, या हॉस्पीटल साठी जि काही मदत करता येईल ति करेल. यावेळी पाथर्डी पंचायत समिती सभापती सुनिता दौडं, पाथर्डीचे  नगरध्यक्ष डॉ मृत्युंजय गजे, उपनगराध्यक्ष  नंदकुमार शेळकेराहुल कारखेले, सोमनाथ खेडकर, डॉ आश्रुबा जायभाये  डॉ सुभाष देशमुख, नगरसेवक बजरंग घोडके, महेश बोरुडेअमोल गजे ,अॅड प्रतीक खेडकर, अजय रक्ताटे, अशोक खरमाटे,संभाजी पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

संस्थेचे अध्यक्ष दत्ता बडे म्हणाले कीग्रामीण भागातील सर्व सामान्य ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रयत्ननाने आपल्या सर्वांच्या मुला मुलींना शिक्षणाची संधी मिळावी.  आपलीही मुले डॉक्टर इंजिनियर व्हावेत म्हणून प्रथम येळी या ठिकाणी इंग्लिश मिडीयम चालू केले. नंतर खरवंडी परिसराची ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींची गरज ओळखून ज्युनियर कॉलेज चालू केले. परंतु आपल्या परिसरातील मुले जवळपास शिक्षणाची सुविधा नसल्याने शिक्षणा पासुन वंचित राहतात बाहेर जाऊन शिक्षण घेणे परवडणारे नाही, हे लक्षात घेऊन आपल्या परिसरात आपल्या मुलांना छोट्या छोट्या  वैद्यकीय शिक्षणाच्या कोर्सच्या माध्यमातुन शिक्षण घेता यावे तसेच परिसरातील मुलंही चांगले शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे रहावेत व सर्व सामण्य उसतोड मजुराना आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने  या ठिकाणी स्व गोपीनाथ मुंडे साहेब शैक्षणिक संकुल व हॉस्पिटल उभारत आहोत, असे सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसचांलन सजंय बडे यांनी केले आभार भगवान बडे यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या