Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवानगड पाणी योजना मंजूर केल्याबद्दल अँड प्रताप ढाकणे यांचा नागरी सत्कार

 योजना मजुंरी नंतर अँड ढाकणे यांनी घेतले संत भगवान बाबा समाधीचे दर्शन 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : भगवानगड व ४६ गावासाठी मजुंर झालेल्या योजनेचे ज्याला कोणाला श्रेय घ्यायचे असेल ते घेऊ दया, कोणाला टमकी वाजायची असेल ती वाजु द्या शेवटी सत्य समोर येत असते . योजना मजुंर कोणी केली काय केले याच्या पेक्षा या योजनेमुळे परिसरातील उसतोड कामगाराच्या जिवणात आम्ही आनंदाचा क्षण देऊ शकलो यांचे समाधान जास्त आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे यांनी केले . 

भगवानगड व ४६ गावासाठी नळ पाणी पुरवठा योजना मजुंर करण्यासाठी अँड प्रताप ढाकणे यांनी पाठपुरावा केल्याने भगवानगड परिसरातील गावाच्या वतीने खरवंडी कासार येथे ढाकणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते .

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशकंर राजळे पाथडीचे नगरपालीकेचे नगरसेवक बडुंशेट बोरुडे क्रॉग्रेस चे तालुकाध्यक्ष नासीर शेख दादासाहेब खेडकर राष्ट्रवादी चे युवाध्यक्ष महारुद किर्तने किरण खेडकर उपस्थित होते .

यावेळी अँड प्रताप ढाकणे म्हणाले की या भागाचे नेतृत्व ढाकणे साहेब करत होते तेव्हा या भागात तळे नाले बंधारे व घाटाशील मध्यम प्रकल्पाच काम झाले तालुक्यात विज आली .

२००५ साली भगवान गड परिसर पाणी योजने बाबत चर्चा सुरू झाली याबाबत अंदोलन केली ग्रामपंचायतचे ग्रामसभेचे ठराव घेतली त्यानतंर हळु हळु सर्व मडंळी त्यामध्ये उतरली हरकत नाही शेवटी हे एकाचे काम नाही हे परिसराचे लोकाचे काम आहे आणि हे कोणाच्याही माध्यमातुन होत असताना या योजनेला मोठे स्वरूप आले पाहिजे हि भुमिका घेतली .

मध्यतंरीच्या काळात राजकारणाची दिक्षा बदलली आघाडीचे सरकार आले. आम्ही सावध झालोत सरकार आपले आहे भगवानगड व परिसर पाणी योजनेला आता जर चालना दिली नाही तर पुन्हा भविष्यात पुन्हा कधी संधी मिळेल ते सागंता येत नाही. म्हणुन आम्ही पुन्हा वर्षापासुन पाठपुरावा सुरू केला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना या योजनेचे महत्व पटवून दिले मंत्री जयंत पाटील मंत्री बाळासाहेब थोरात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी पाठपुरावा केला .

 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाणी पुरवठा विभागाला पत्र दिले. चार महिण्यापुर्वी पुन्हा राजस्थान च्या एका एजन्सी मार्फत सव्हें केला . त्यांना आम्ही ही काही सुचना केल्या. काही नव्याने गावे सामाविष्ठ करण्यात आली. मोहटादेवी ,तारकेश्वर गडाचाही यात समावेश होत आहे . २००५ साली लावलेले छोटे झाड आता फळ देणार आहे .

कोरोनाच्या साथ रोगामुळे सरकारची परिस्थिती हलाखी ची झाली असतानाही आपल्या मतदार सघांमध्ये पाथर्डी शेवगाव पाणी योजने साठी १७३ कोटी व भगवानगड व परिसर पाणी योजनेसाठी १९२ कोटी असा भरीव निधी या सरकारने मजुंर केला आहे. त्या बदल त्यांनी सरकारचे आभार मानले.

ज्या भगवानबाबांच्या नावाने नळ योजना मजुंर झाली त्या भगवान गडाच्या पायथ्याशी भुमिपुजन होईल. हा एका पक्षाचा कार्यक्रम नाही. ज्यां ज्या मंत्री महोदयानी या योजनेसाठी मदत केली त्यां सर्वाना आणुन भव्य भुमिपुजन कार्यक्रम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले .

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशकंर राजळे म्हणाले की ,भाजपच्या आमदारानी फुकटचे श्रेय घेऊ नये . तुमच्या सरकारच्या काळात योजना का मजुंर झाली नाही. उलट योजना मजुंर नसतानाही आपण लोकाना खोटे बोलुन मते लाटली. आता तरी खोटे बोलु नका व फुकटचे श्रेय घेऊ नका , असा टोला त्यांनी आमदार राजळे यांना नाव न घेता लगावला . पाणी योजना मंजूर झाल्याने अँड प्रताप ढाकणे यांचा खरवंडी कासार येथे ग्रामस्थांच्या वतीने जंगी नागरी सत्कार  करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या