Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवानगडासह ४६ गावांच्या पाणी योजनेला अखेर मंजुरी- अॕड.प्रतापराव ढाकणे

 *दि.२० फेब्रुवारीला काम सुरू करण्याचे मंत्री पाटील यांचे आदेश

* पूर्व भागाची तहान भागनार



 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


पाथडीॕ- भगवानगड व ४६ गावांच्या पाणी पुरवठा योजनेला महाविकास आघाडी सरकारने मुंबई येथे झालेल्या बैठकीत मंजूरी दिली असून दि.२० फेब्रुवारी पयँत सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात   करण्याचें आदेश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी  तत्काळ दिले असल्याची  माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी दिली.


  आज सकाळी मुंबई येथे मंत्री पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीस पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशैखर घुले, अॕड.प्रतापराव ढाकणे, डाॕ.क्षितीज घुले,तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडू पाटील बोरूडे,बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे उपस्थित होते.


 अॕड ढाकणे म्हणाले की, तालुक्याच्या पूर्व भागासाठी महत्त्वाची असणारी ही पाणी योजना असून आपण व घुले यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आज सकाळी मुंबईत बैठक झाली . यात पालकमंत्री मुश्रीफ,मी व घुले यांनी या योजनेची  किती गरज आहे,ती मांडली.  ४६ गावांसाठी भेडसावणारा  पाण्याचा प्रश्न लक्षात घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण कृरून दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचे लेखी आदेश संबंधित विभागाला दिले. 


आजच्या बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे पाथडीॕचा सतत तहानलेला असणारा पूर्व भाग आता पिण्याच्या पाण्यासंदभाॕत समृद्ध होईल. अनेक वर्षांची या परिसरातील लोकांची मागणी पूर्ण झाल्याने अॕड. ढाकणे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या