Ticker

6/Breaking/ticker-posts

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारला पडला विसर..!

 

तनियमित कर्जदार  शेतकऱ्यांना ५० हजार  मिळावेत ,जिल्हा बँकेचे संचालक  राळेभात यांची मागणी

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 जामखेड : शेतकऱ्यांच्या अडचणी दुर करणे हे माझे कर्तव्य आहे आणी त्यासाठी  सदैव प्रयत्न करील  महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. एकाही शेतकऱ्याला या योजनेचे अनुदान मिळाले नाही तसेच नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन १९-२० व २०-२१  शासनाने व्याजही दिले तरी हे लवकर मिळावे आशी मागणी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी केली आहे .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करताना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती . अद्यापपर्यंत  शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा झाले नाही . थकबाकी कर्जदराचे कर्ज माफ होऊन परत दुसरे कर्ज काढले आहे. तरी देखील नियमित कर्ज भरणाराच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झालीच  नाही.

भविष्यात नियमित कर्ज भरणारे शेतकरी कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता  आहे.  ही घोषणा फसवी असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत . बियाणे, रासायनिक खत व मजुरीचे वाढलेले दर लक्षात घेतल्यास अनेक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हजारो कर्जदारांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे  अनेकांनी तर दागिने विकून, सोने गहाण ठेऊन हातउसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्ज नियमित करून घेतले आहेत. राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना  बाजूलाच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरून आमची चूक झाली का, असा संतप्त सवाल  शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. . त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढून सर्व संस्था बँका अडचणीत येण्याची भीती संचालक अमोल राळेभात यांनी व्यक्त केली 

शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी दुर करणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी सदैव प्रयत्न करील.प्रोत्साहनपर जाहीर केलेली पन्नास हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा करावी अशी  मागणी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या