लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी: तालुक्याची उसतोडणी कामगारांचा तालुका अशी ओळख
आहे. साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर येथील अनेक कुटुंबीय उसतोडणी
साठी कारखान्याकडे रवाना होतात. विजयादशमीला बहुतांश साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत त्यामुळे
उसतोडणी कामगारांची कारखान्याकडे जाण्याची लगबग सुरु झाली आहे.
दिवाळी पूर्वीच वाड्यावस्त्यावरील उसतोडणी कामगारांचे साखर कारखान्याच्या गलीत हंगामाकडे लक्ष लागलेले असते. सध्या जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यातील गळीत हंगाम सुरु आहेत. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांची कुटुंबासह कारखाना गाठण्याची लगबग सुरु आहे. ऊस तोडणी कामगार कारखान्यावर जात असल्याने तालुक्यातील तांडे, वाड्या, वस्त्या ओस पडले आहेत. यावर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिराऊन गेला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उसतोडणी साठी गेले आहेत.
0 टिप्पण्या