Ticker

6/Breaking/ticker-posts

अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार : वसंत लोढा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर :नगरच्या व्यापार उद्योगाची  कामधेनू असलेल्या नगर अर्बन मॅलिटीस्टसेट को ऑप बँकेची आगामी निवडणूक बँकेच्या उद्धारासाठी बिनविरोध करणे ही काळाची गरज आहे. यामुळे त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 गेली २ वर्ष नगर अर्बन बँकेवर आर बी आय ने निर्बंध घालून प्रशासकाची नियुक्ती केली होती. या विजनवासातून आता बँकेची सुटका झाली आहे. नगर सह राज्यातील विविध शहरात  व्यापार उद्योग आणि सेवा क्षेत्राला अर्थ सहाय्य करून बळकटी प्राप्त करून देण्यात अर्बन बँकेने अहम भूमिका बजावलेली आहे. ही बँक उभारण्यात आणि तिला सर्व सामान्यांची हक्काची बँक म्हणून नावारूपाला आणण्यात अर्थ आणि सहकार क्षेत्रातील अनेक धुरिणांनी योगदान दिले आहे.

नगरची अर्बन बँक ही  नगर जिल्ह्याची ओळख आहे. तेव्हा या बँकेची सहकार क्षेत्रातील गरिमा कायम राहावी आणि बँकेला आपले गत वैभव  प्राप्त करून देण्यासाठी सध्या तोट्यात असलेली बँक नफ्यात आणणे क्रमप्राप्त आहे. 

 नगर अर्बन बँक वाचवण्यासाठी राजेंद्र गांधी आणि  सहकार्यांनी बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून भगीरथ प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला आता यश येऊ पाहत आहे. त्यामुळे राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकेत नव्याने नियुक्त होणारे संचालक मंडळ बिनविरोध निवडले जाणे आवश्यक आहे.  कारण बँक सध्या तोट्यात आहे. एम पी ए ७० टक्के  आहे. बँकेच्या ठेवी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. त्यात बँकेची निवडणूक जर झाली तर त्याला अंदाजे दीड ते पावणेदोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे . हा खर्च बँकेला सद्य स्थितीत न परवडणारा आहे. मोठी ऐतिहासिक परंपरा असलेल्या बँकेला अर्थ व सहकार क्षेत्रात मानाचे स्थान आहे.   त्यामुळे बँकेचे लाख मोलाचे सभासद, हितचिंतक, माजी संचालक आणि सर्व पक्षीय नेतेमंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित करून बँकेचे संचालक मंडळ बिनविरोध करून नवा पायंडा पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वसंत लोढा यांनी सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या