Ticker

6/Breaking/ticker-posts

खुनाचे गुढ : बापाने स्वतःच्या मुलीचा खुन करुन मृतदेहाची लावली विल्हेवाट..!

 

*तपास लावुन गुन्हा दाखल करावा किसन आव्हाड यांची मागणीलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 


पाथर्डी : तिसगाव येथील एका व्यावसायीकाने कोरोनाचा बहाणा करुन स्वतःच्याच मुलीचा खुन करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट शेजारच्या गावातील शेतामधे लावली आहे. असा आरोप करुन खुनाचा तपास लावुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे तालुका संयोजक किसन आव्हाड यांनी केली आहे. 

 तिसगाव  येथील एका व्यावसायिकाने त्याची १७ वर्षाची मुलीच्या वर्तणुकीवर संशय घेवुन नातेवाईकांच्या मदतीने राहत्या घरातच हत्त्या केली. तिच्या मृतदेहाची आपल्या दुसऱ्या गावाच्या हद्दीतील शेतामध्ये रात्रीच विल्हेवाट लावली. सकाळी गावात येऊन आमच्या मुलीला कोरोना (कोविड -19) झाला होता. त्यामुळे शासनानेच अंत्यसंस्कार केल्याचे लोकांना भासविले. या कामी त्याला आरोग्य अधिकाऱ्याने मदत केली. त्या व्यक्तीला एका आरोग्य विभागातील अधिका-याने मदत केल्याची चर्चा आहे. याची माहिती समजताच खुनाचा प्रकार दडपण्यासाठी काही पोलिसांनी वरीष्ठ पोलिस अधिका-यांच्या नावाचा वापर करुन सदर व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिस निरीक्षक व पोलीस स्टेशनला माहीती न देता फक्त संबंधीताकडून वारंवार पैसे घेऊन हा खून दडपला.

 या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तीवर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा. या प्रकरणातील पोलिसांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे दिनांक १३ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे शेवगाव येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा किसनआव्हाड यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति राज्याचे गृहमंत्री, वरीष्ठ पोलिस अधिकारी यांना दिल्या आहेत.

 दरम्यान पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांनी याबाबत चौकशी सुरु केली असुन संबधीतांना बुधवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविले आहे.  याबाबत अंत्यविधीसाठी उपस्थीत असलेल्या एकाने पोलिस अधिका-यांना काही माहीती दिल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ लवकरच स्पष्ट होईल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या