Ticker

6/Breaking/ticker-posts

शहरासह जिल्हाभरात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर :  लखीमपुर घटनेचा जिल्हा राष्ट्रवादी,कॉग्रेस,शिवसेनेकडून महाविकास आघाडीसरकारच्यावतीने जिल्हाभरात निदर्शने, घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. व्यापऱ्यानी देखील बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला व  बंद  कडकडीत पाळण्यात आला .

शहर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लखीमपूर घटनेचा निषेध  म्हणुन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाजप सरकार विरोधात निदर्शने केली. आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार अहमदनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंत्रीपुत्राचा प्रतीकात्मक पुतळा दहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक मतीन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक मतीन सय्यद समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव अथर खान, विशाल बेलपवार, वसीम शेख, दिपक लिपाने, आसिफ शेख, कलीम शेख, सलमान शेख, अन्सार सय्यद, जावेद शेख आदी उपस्थित होते.



महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूर (उत्तर प्रदेश) येथील बळीराजांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडणार्‍या केंद्र सरकारचा निषेध करून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, ‘राष्ट्रवादीचे अ‍ॅड. उद्धवराव दुसुंगे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, दीप चव्हाण, अनिल बोरुडे, बाळासाहेब बोराटे, माधवराव लामखडे, अशोक बाबर, किसनराव लोटके, विजय पठारे, सुरेखा कदम, अरुणा गोयल, सुनीता बागडे, नलिनी गायकवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 जिल्ह्यातील   नागरिक, व्यापऱ्यानी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांचे मारेकरी म्हणजेच भाजपला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून भारतीय जनता पक्षाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत, अशी घणाघाती टीका करुन मंत्र्यांचा मुलगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारतो तरीही केंद्र सरकार व उत्तरप्रदेश सरकार  यांचे ह्रदय द्रवले नाही. या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी भाजप आटापिटा करत असल्याचा आरोप करण्यात आला .यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

                           

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या