Ticker

6/Breaking/ticker-posts

दिवाळीपूर्वी ठेकेदारांची बीले मिळाली नाहित तर सर्व विकासकामे थांबवू

 *बिल्डर्स असोसिएशनचा राज्यव्यापी आंदोलनात इशारा लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : - राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या खात्यांकडे राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले प्रलंबित आहेत. याच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. सर्व जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताच्या कार्यालयावर आज धरणे आंदोलन केले. नगर मध्येही अधिक्षक अभियंता कार्यालयावर धरणे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. पवार व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता एच.एन.सानप यांना निवेदन देण्यात आली.   

यावेळी असोसिएशनचे कंत्राटदार समिती चेअरमन महेश गुंदेचा, जिल्हाध्यक्ष अनिल कोठारी, सेक्रेटरी उदय मुंढे, संजय गुंदेचा, दिगंबर जगताप, आदिनाथ घुले, राजेंद्र जाधव, संजय डोके, अनिल सोनावणे आदींसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

महेश गुंदेचा म्हणाले, राज्य सरकारने विकास कामे करत असलेल्या कॉंट्रॅक्टरांची शेकडो कोटी रुपयांची देयके थकवून मोठा अन्याय केले आहे. केवळ नगर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ६९५ कोटी तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने कडे १२५ कोटी रुपयांचे देयके प्रलंबित आहेत. वारंवार मागणी व आंदोलने करूनही अद्याप राज्य शासन कोणतेही सहकार्य करीत नाहीये. त्यामुळे ठेकेदारांची बँकेच्या कर्जाची हफ्ते, व्याज, कामगारांचे पगार, मजुरांचे पगार, मशिनरीचे इंधन बिले, पुरवठादारांचे देणे थकल्यामुळे खूप मोठ्या अडचणीत सापडून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जर येत्या दिवाळी पूर्वी सर्व ठेकेदांची प्रलंबित देयके मिळाली नाहित तर बिल्डर असोसिएशन कठोर निर्णय घेऊन संपूर्ण राज्यातील सर्व विकासकामे आहे त्या स्थितीत थांबवू, असा इशारा त्यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या