लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी: छत्रपती शाहू महाराज, म.ज्योतिरावफुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी समाज सेवकांनी जातनिर्मूलनासाठी रोटी बरोबरच बेटी व्यवहार करणे
आवश्यक आहे असल्याची आग्रही भूमिका त्यावेळी मांडली होती. तोच आदर्श घेऊन तालुक्यातील
चिंचपुर पांगुळ येथे कु. शीतल बाबासाहेब रंधवे व दादासाहेब मारुती दहिफळे या
वधू-वरांचा आंतरजातीय प्रेमविवाह सोहळा सर्वांच्या साक्षीने पार पडला. हा विवाह करुन रंधवे- दहिफळे कुटूंबियानी
समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
चिंचपुर
पांगुळ येथील बाबासाहेब रंधवे आणि मोहटे ता.पाथर्डी येथील मारुती दहिफळे यांच्या सदर विवाह सोहळा
हा बौद्ध धम्म पद्धतीने गौतम बुद्ध तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस
पुस्पहार अर्पण करून मोजक्याच पाहुणे मंडळींच्या उपस्तितीत कोव्हिड १९च्या सर्व
नियमांचे पालन करत अतिशय आनंदाने व उत्साहात पार पडला.
यावेळी
विवाह प्रसंगी उपस्थित सेवा .निवृत्त .पो .निरीक्षक जगन्नाथ शि. बडे यांनी
बोलतांना सांगितले की समाजाला लागलेला जात हा रोग जर संपवायचा असेल तर असे धाडस
करणाऱ्या तरुण-तरुणीच्या पाठीमागे कुटूंबाने ,समाजातील
प्रत्येक घटकाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तरच जातव्यवस्था समूळ नष्ट होईल. या
विवाह सोहळा निमित्त परिसरातून वधू -वरा सह दोन्ही
कुटूंबाचे अभिनंदन तथा कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी
रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू आढाव, सेवा.नि.पो.
जगन्नाथ बडे, विक्रम बडे, गोरख वाघमारे,
बन्सी रंधवे, भन्ते महानाम , भन्ते अनिरुद्ध बौद्दाचार्या ,वसंत बोर्डे, आनंद रंधवे,किशोर अबिलढगे , रि
.प .सेना .जि. सरचिटणीस अशोक गायकवाड, जि. संघटक कुंदन
तुपेरे, शेवगाव ता. अध्यक्ष वसंत साबळे, जामखेड ता.अध्यक्ष मंगेश घोडेस्वार, बबन गव्हाणे, जामखेड तालुका संघटक प्रथम
सोनवणे, भारिप ता. अध्यक्ष शेवगाव ,भानुदास
जाधव, राहुरी तालुका अध्यक्ष, मा.जि .प
.सदस्य गहिनीनाथ शिरसाठ, आजीनाथ खेडकर, पोपट बडे, आर .के .बडे, मेजर
गणपत दहिफळे, मेजर
शरद केदार, रोहिदास पालवे, आनंद रंधवे,
पत्रकार व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
0 टिप्पण्या