Ticker

6/Breaking/ticker-posts

पतसंस्थेच्या माध्यमातून हमाल-माथाडिंच्या उन्नत्तीचे काम- अविनाश घुले

 स्व.शंकरराव घुले माथाडी पतसंस्थेची ऑनलाईन सभा संपन्नलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: हमाल-माथाडी कामगारांचे हित साधण्यासाठी स्व.शंकरराव घुले यांनी या पतसंस्थेच्या स्थापना केली. गेल्या अनेक वर्षांपासून पतसंस्थेच्या माध्यमातून हमाल-माथाडी कामगारांची आर्थिक उन्नत्ती साधण्याचे काम केले आहे. त्यांना आर्थिक शिस्त लागावी, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी पतसंस्था काम करत असून, पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांची समाजात पत निर्माण करण्याचा काम केले आहे. मध्यंतरी मागील सरकारच्या नियमांचा फटका पतसंस्थेला बसला होता, त्यामुळे एनपीएत वाढ झाली होती. परंतु आताच्या सरकारने नियम बदलत पतसंस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे. पतसंस्थेचा आधार हमाल-माथाडी कामगारांना वाटत असल्याने संस्थाही प्रगतीपथावर आहे. पतसंस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत असून, हमाल-माथाडी यांच्या उन्नत्तीचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून सुरु असल्याचे प्रतिपादन जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

 

स्व.शंकरराव घुले माथाडी कामगारांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. याप्रसंगी श्री.घुले बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन बबनराव आजबे होते. यावेळी व्हाईस चेअरमन नारायण गिते, संचालक सचिन ठुबे, दिगंबर सोनवणे, सचिन कर्पे, नवनाथ लोंढे, रत्नाबाई आजबे, आशाबाई रोकडे उपाध्यक्ष गोविंद सांगळे, मधुकर केकाण, राम पानसंबळ, रवि भोसले, साहेबराव आजबे, आषिश राहिंज उपस्थित होते आदि उपस्थित होते.

 

यावेळी चेअरमन बबनराव आजबे यांनी संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 26 लाख 40 हजार रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना 10 टक्के डिव्हीडंट देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगून पतसंस्थेच्या माध्यमातून हमाल-माथाडी यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यांच्यासाठी विविध योजना राबवविण्यात येत आहे. अत्यल्प दरात कर्ज देण्याबरोबरच ठेवीदारांना चांगल्या दराने व्याज दिले जाते. त्याचबरोबर त्यांच्या अडचणी काळात पतसंस्था त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहत आहे. आमदार संग्राम जगताप व हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन माथाडी पतसंस्थेची थांबवलेली कर्ज हप्ते वसुली सुरु केली. कामगारांनीही माथाडी मंडळात लेव्ही भरणा करावा असे आवाहन करुन संचालक मंडळ, सभासदांच्या सहकार्याने पतसंस्था प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.

संस्थेचे सचिव संजय महापुरे यांनी आर्थिक पत्रकाचे वाचन केले. प्रास्तविकात व्हाईस चेअरमन नारायण गिते यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. यावेळी सभासदांच्या जनता अपघात विमा योजनेस मान्यता देण्यात आली.  सर्वांच्या एकमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले. आभार सचिन ठुबे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या