Ticker

6/Breaking/ticker-posts

सीईटी परीक्षा १५ सप्टेंबरपासून MHT CET Admit Card: एमएचटी सीईटीचे हॉलतिकीट लवकरच

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई :बीटेक, बीई पेपरसाठी हॉलतिकिट लवकरच जारी केलं जाणार आहे. महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल बीटेक,बीई अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (Maharashtra Common Entrance Test Cell) हॉलतिकिट अधिकृत वेबसाइट mhtcet2021.mahacet.org वर जारी करेल.

बीटेक आणि बीई प्रोगामसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती भरावी लागेल. याव्यतिरिक्त या वृत्तात पुढे दिलेल्या पद्धतीने देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.

BTech आणि BE पेपर परीक्षेसाठी प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे?

B.Tech आणि BE परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Mhtcet2021.mahacet.org ला भेट द्या. त्यानंतर 'Download' विभागाच्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा इतर तपशीलांसह लॉगिन करा. प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआउट आणि सूचनांमध्ये नमूद केलेली इतर कागदपत्रे परीक्षा केंद्रावर आणणे आवश्यक आहे. यामध्ये, फोटो आयडी ओळखपत्रासाठी दिलेल्या पर्यायांपैकी एक उमेदवारांना सोबत बाळगायचे आहे. या व्यतिरिक्त, उमेदवारांनी लक्षात घ्यावे की प्रवेशपत्रात परीक्षेचे शहर, केंद्र, रोल नंबर इत्यादी तपशील असतील. ते नीट तपासा. यावर्षी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम आणि कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकार सामान्य प्रवेश परीक्षा (CET) घेतलेली नाही. हे प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे होणार आहेत किंवा झाले आहेत. महाराष्ट्र सीईटी सेलने एमएएच एमबीए सीईटी 2021, एमएएच एमएमएस सीईटी 2021, एमसीए सीईटी 2021 यासह काही सीईटींसाठी आधीच प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या