Ticker

6/Breaking/ticker-posts

नराधम चौव्हाणला फाशी ऐवजी कठोर वेदनादायी शिक्षा द्यावी- माजी मंत्री अण्णा डांगे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर : मुंबई उपनगरात साकीनाका परिसरातील बलात्काराची घटना मन बधीर करणारी आहे. अत्याचार करणाऱ्या नराधम मोहन चौहाणला फाशीची शिक्षा नको. त्याने ज्या प्रमाणे मुलीवर अत्याचार करून वेदना दिल्या. त्यापेक्षा अधिक वेदनादायी शिक्षा द्यावी अशी चमत्कारिक मागणी राज्याचे माजी मंत्रीअण्णा डांगे यांनी केली आहे.

ते म्हणाले , पाशवी अत्याचार करणाऱ्या चौहाणला फाशी द्या अशी सर्वत्र मागणी होत आहे. पण नुसती फाशी देऊन चालणार नाही. कारण आधुनिक फाशीमध्ये संबंधीतास नगण्य वेदना होत असतात. त्या काही सेकंदा पुरत्या असतात. आपण कधीतरी मरणारचं आहोत. या भावनेने पुन्हा पुन्हा असे कृत्य घडते. ही विकृती हद्दपार करण्यासाठी कडक शिक्षा असायलाचं हवी.

मुंबईत चौहाण सारख्या नराधमाने बलात्कारित मुलीबरोबर अघोरी शारीरिक अत्याचार केले यामुळे "त्या" मुलीला झालेल्या वेदना काय असतील याचे कल्पनाही करू शकत नाही. तिच्या वेदना त्या नराधमास कशा समजणार ? म्हणून "त्या" नराधमाला त्यापेक्षाही दसपटीने तीव्र वेदना होणारी शिक्षा द्यायला हवी. बलात्काऱ्यांना अशा शिक्षा होऊ लागल्या तरच महिलांच्या वरील अत्याचाराच्या घटना कमी होतील, असेही डांगे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या