Ticker

6/Breaking/ticker-posts

भिंगारचे गणपती विसर्जन शांततेत; मानाच्या गणपतीची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर : नगर शहरातील भिंगार उपनगरांमध्ये आज गणपती विसर्जन शांततेत पार पडले. येथील देशमुख वाड्यातील मानाच्या गणपतीची आरती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.  मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आलेला होता.

 कोरोना  असल्यामुळे अनेक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते सण उत्सव साधेपणाने साजरी करा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते. यंदा गणपती उत्सव सुद्धा अतिशय साधे प्रमाणे सर्वत्र साजरा करण्यात येत आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून यांना च गणेशोत्सव साजरा केला.

 नगर शहरातील भिंगार उपनगरांमध्ये सुद्धा सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. भिगार येथील 48 मंडळांनी गणेशाची स्थापना केली होती, मंगल मूर्ती मोरया असा जयघोष करत प्रथेप्रमाणे काल भिंगार येथे गणपती विसर्जन पार पडले. येथील पोलिस प्रशासन व कॅंटोन्मेंट बोर्डाने मिरवणुकीला बंदी असल्यामुळे गणपती विसर्जनासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था या वेळी करण्यात आलेली होती.  भिंगार येथील मानाचा देशमुख वाडा येथील मंडळा च्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, भिंगाच्या मानाचा गणपती विसर्जन होण्यापूर्वी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी गणपतीची आरती करण्यात आलीत्यानंतर बाजूलाच असलेल्या एका ठिकाणी गणपतीचे विसर्जन यावेळी करण्यात आले. यावेळी समीर देशमुख, अश्विनकुमार देशमुख कार्तिक देशमुख शिवसेनेचे शहर पमुख दिलीप सातपुते, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे,पोलीस निरीक्षक डी बी भोसले, ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, जिल्हा परिषद चे सदस्य शरद झोडगे,रवींद्र लालबोद्र,विष्णू घुले,सुनील लाल बोंद्रे,शुभांगी साठे,बापा घुले आदी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, भिंगार येथील मानाच्या देशमुख वाडा गणपती ट्रस्टने प्रथेप्रमाणे गणरायाची स्थापना केली व आज विसर्जन करता मला आरतीसाठी याठिकाणी बोलवले, आज आणि रविवारी गणेश विसर्जन सर्वत्र होत आहे, कुठे ही गर्दी करू नका, तसेच मिरवणूक काढू नका असे निर्बंध घालण्यात आलेले आहे .येथील जनतेने प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मी येथील जनतेचे आभार मानतो अशाच पद्धतीने रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे असे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या