Ticker

6/Breaking/ticker-posts

कल्याण विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर संतप्त ग्रामस्थानी केले खड्डयात वृक्षारोपन

  


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :कल्याण विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर पाथर्डी ते फुंदे टाकळी दरम्यान मोठ मोठाले खड्डे आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने संतप्त ग्रामस्थानी रस्त्या वरिल खड्यात वृक्षारोपन करत संताप व्यक्त केला .

पाथर्डी भाजपा तालुकाध्यक माणीक खेडकर भाजपा युवा मोर्चो चे जिल्हा सचिव सचिन पालवे फुंदे टाकळी चे सरपंच सचिन फुंदे . उपसरपंच कल्याण फुंदे ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण फुंदे पंढरीनाथ फुंदे बंद्रीनारायण फुंदे नवनाथ फुंदे अर्जुन फुंदे भऊसाहेब  फुंदे आदीनी वृक्षारोपन करत राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध व्यक्त केला. 

कल्याण विशाखापटनम जुणा रा . क्र. 222 नवा रा .क्र. निर्मल ६१  या राष्ट्रीय महामार्गावरील अहमदनगर ते फुंदे टाकळी या अंतरावरील काम गेल्या पाच वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे त्यातच पाथर्डी ते फुंदे टाकळी या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झालेली आहे यापुर्वी अनेक अंदोलन झाली अनेका चे जिव गेले मात्र राष्ट्रीय महामार्गा चे काम झाले नाही .

आता पाऊस काळ्या तर रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला आहे . वाहन चालवताना मोठी कसरत करून ही अपघात होत असल्याने  प्रवाश्या बरोबर या भागातिल  स्थाणीक ग्रामस्थांना ही मोठा त्रास होत आहे याकडे लक्ष वेधावे म्हणुन ग्रामस्थानी रस्त्यावर वृक्षारोपन केले .

आता निर्णायक आंदोलन; 

यावेळी बोलताना म्हणाले की या मार्गावरील रस्त्यावर दोन तिन फुटा चे खड्डे आहेत चार चाकी वाहन चालवताना खड्डे हुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाकडून अपघात होतात यापुर्वी अनेकदा अंदोलन केली आता तरी प्रशासनाला जाग येईल असे वाटते नाहीतर आता आम्हाला  निर्णायक अंदोलन करावे लागेल. असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष माणीक खेडकर यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या