पद्म ऍग्रो प्रॉडक्ट उद्योगाचे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).
नगर : रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी नवनवीन उद्योगांची उभारणी सध्याच्या काळात आवश्यक बनली आहे. कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध असुन सुरपुरिया परिवाराने साकारलेला पद्म ऍग्रो प्रॉडक्टस हा उद्योग मोठी भरारी घेईल, असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
अकोले येथील अजित सिमरतमल सुरपुरिया यांनी संगमनेर को ऑप.इंडस्ट्रीयल इस्टेट येथे सुरु केलेल्या पद्म ऍग्रो प्रॉडक्टस या उद्योगाचा शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते नुकताच झाला. यावेळी तुषार अजित सुरपुरिया, नगरसेविका मीनाताई मुनोत, माजी नगरसेवक संजय चोपडा, कांतीलाल गांधी, विजय सारडा, सुधाकर देशमुख, दीपक महाराज देशमुख, कैलास शेळके, राजेंद्र गांधी, संतोष सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
तुषार सुरपुरिया यांनी उपस्थितांचे स्वागत करीत उद्योगाची माहिती दिली. पद्म ऍग्रोमध्ये काजूवर प्रक्रिया करून दर्जेदार उत्पादनाची निर्मिती केली जात आहे. संगमनेर, अकोले परिसरात रोजगार निर्मितीला चालना मिळण्यास या उद्योगामुळे मदत होणार असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले.
0 टिप्पण्या