Ticker

6/Breaking/ticker-posts

पाण्यात वाहून गेलेल्या दोघा भावांपैकी एकाचा बुडून मृत्यू

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 पाथर्डी : पाण्यात वाहून गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावात हि दुर्देवी घटना घडली आहे. प्रदीप सुभाष डाके वय १२ वर्षे रा. सुसरे असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. सुसरे येथील देवीच्या दर्शनासाठी नदीतुन जाणारे दोन भावंडे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहुन गेले. त्यापैंकी एकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. 

दुसरा भाऊ प्रदीप सुभाष डाके हा पाण्यात बुडुन मृत्यु पावला. बुधवारी दुपारी तिन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सुसरे येथील प्रदीप सुभाष डाके व आदित्य सुभाष डाके हे दोन भाऊ देवीच्या मंदीराकडे जात होते. नदी ओलांडताना पाण्याचा अंदाज आला नाही त्यावेळी आदित्य व प्रदीप पाण्यात वाहुन गेले. जवळच कपडे धुणा-या महीलांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. गावातीलच केशव बर्डे यांनी नदीच्या पाण्यात बुडी घेवुन आदित्य सुभाष डाके याला पाण्याच्या बाहेर काढले त्याचा जिव वाचविला.

 मात्र प्रदीप सुभाष डाके हा बुडालेल्या ठिकाणापासुन तिनशे ते चारशे फुट अंतरावर पाण्यावर तरंगताना आढळुन आला. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यादुर्देवी घटनेमुळे सुसरे गावात शोककाळा पसरली आहे.मागील आठवड्यात झालेल्या पाऊसाने तालुक्यात सर्वत्र नद्या ओसंडून वाहत आहे. अश्यात पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अश्या घटना घडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या