Ticker

6/Breaking/ticker-posts

मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले...

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कल्याण:   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत मोठे विधान केले आहे. आज जरी मंदिरे बंद असली तरी देखील आपण सध्या अत्यावश्यक आरोग्य मंदिरे उघडत आहोत. त्याबद्दल जनता नक्कीच आशीर्वाद देईल, असे सांगतानाच राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडली जातील, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आज मंदिरे बंद आहेत. मात्र ही मंदिरे जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरे मात्र हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडत आहोत. त्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. राज्यातील धार्मिक स्थळे उघडली गेली पाहिजेत हे ठिक आहे. त्यापेक्षा तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे, आज त्याचीच आवश्यकता आहे, असे कपिल पाटील यांना उद्देशून म्हणताना, की आरोग्य केंद्र बंद करून त्याच्याबाजूचे मंदिर उघडू? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी कपिल पाटील यांना केला. आरोग्य केंद्र महत्त्वाचे असल्याचे सांगत आपण मंदिरेही उघडणार आहोत. पण एका टप्प्याटप्प्याने आपण जात आहोत, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

आपण घोषणा देतो. भारत माता की जय असे म्हणतो. घोषणा दिल्याच पाहिजेत. आम्ही देखील घोषणा दिलेल्या आहेत. आम्ही त्याच्याही जाऊन हिंदूत्वाचे रक्षण केले आहे. सन १९९२-९३ मध्ये शिवसेनेने ते दाखवूनच दिले आहे. मात्र भारत माता की जयबोलल्यानंतर भारत मातेची मुले जर आपल्या आरोग्यासाठी तळमळत असतील तर ती भारत माता आपल्याला काय सांगेल? अरे माझा जयघोष काय करता? माझ्या बाळांकडे पाहा, त्यांना औषधे आणिद् सोयी सुविधा द्या, असेच भारत माता सांगेल. केवळ घोषणा दिल्याने ही मुले बरी होणार नाहीत. या मुलांना कसे बरे करता येईल ते पाहा असेही भारत माता म्हणेल. हे लक्षात घेता त्या दिशेने आपण पाऊल टाकत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


'सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावे'

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागावे अशी विनंती सर्व राजकीय पक्षांना आपण केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोनाचं संकट अजूनही दाराशी आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जरा संयमाने वागायला हवे. आपले राजकारण हे चालत राहणार आहे, मात्र, आपण जबाबदारीने वागणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण जबाबदाराने वागलो नाही तर कसे होईल? जनता कशी वागेल? जनता आपल्याकडून कशी अपेक्षा ठेवेल? ही जबाबदारी ओळखूनच सर्वांनी वागावे, असे आवाहनही त्यांनी राजकीय पक्षांना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या