Ticker

6/Breaking/ticker-posts

घाटशिळ पारगाव धरण सलग दुसऱ्या वर्षीही ओव्हरफ्लो शेतकरी आनंदला


















लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


खरवंडी कासार : कायम स्वरुपी दुष्काळी भाग म्हणुन कपळा वर शिक्का बसलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागासाठी वरदान ठरलेल्या या भागातील घाटशिळ पारगाव मध्यं प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी ही भरला सन २०१६ नंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते मात्र मागील वर्षी व याही वर्षी परतीच्या मानसुन चे जोरदार पणे आगामन झाल्याने धरण भरले आहे. 

पाथर्डी तालुक्यातिल या धरणामुळे नगर व बीड जिल्ह्यातील सुमारे १५६७ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असुण शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे पाथर्डी तालुक्याच्या पुर्व भागातिल मालेवाडी ढाकणवाडी खरवंडी किर्तनवाडी भारजवाडी या गावाला कालव्या द्वारे शेती ला पाणी मिळते तसेच या धरणातून पाईपलाईन द्वारे शेतीसाठी पाणी नेहले जात असल्याने धरणाच्या वरील टाकळी मानुर गाडेवाडी जवळवाडी गावच्या शेतीला ही लाभ होणार आहे धरण भरल्याने शेतकर्‍यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून गेल्या सन १९७२ मध्ये माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी पाथर्डी तालुक्यातील पूर व दुष्काळ भागाला व ऊस तोडणी कामगारांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी यांच्या प्रयत्नातून सुमारे ४३७ दशलक्ष घनफूट समता असलेल्या मध्यम प्रकल्पाची उभारणी केली.

घाटशिल पारगाव प्रकल्पाच्या वर कुत्तरवाडी तलाव असल्याने हा तलाव भरल्याशिवाय या प्रकल्पात जास्त प्रमाणात पाणी येत नाही या वर्षी जोरदार पावसाने कुतरवाडी तलाव भरला आहे त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने व लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण भरले आहे चौकट सन १९७२ मध्ये माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी पाथर्डी तालुक्यातील पूर्वला असणाऱ्या दुष्काळ भागातील ऊस तोडणी कामगारांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले त्याच्या प्रयत्नातून सुमारे ४३७ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मध्यम प्रकल्पाची उभारणी झाली याचा मृत्तसाठा १४० दशलक्ष घनफूट आहे तलावाच्या डाव्या कालव्यातून सुमारे १४९७ हेक्टर क्षेत्र तर डाव्या कालव्यातून १६३ हेक्‍टर क्षेत्र ओलीता खाली येते चौकट घाटशील पारगाव मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. 

आता पुन्हा हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तिन चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस झाल्यास घाटशिळ पारगाव प्रकल्पाखालील नदीला अचाणक पुर येण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी जागृत राहणे आवश्यक आहे राजु तांबोळी शाखा आभियंता घाटशिल पारगाव मध्यम प्रकल्प फोटो पाथर्डी तालुक्याच्या पुर्व भागासाठी वरदान असलेला घाटशिल पारगाव धरण ओव्हर फ्लो झाले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या