Ticker

6/Breaking/ticker-posts

विरोधकांचा कांगावा न समजण्याइतपत आम्ही नक्कीच खुळे नाहीत- राजेंद्र नागवडे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 श्रीगोंदा :  साखर विक्रीतील घोटाळ्याचे खंडन करताना चालू  दरानुसार शिवम एंटरप्रायजेसला संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली त्यानुसार साखर विक्री केली. नंतर थोडे फार दर वाढले लगेच विरोधकांनी कांगावा सुरू केला. कारखान्याचा तोटा होईल असा एकही निर्णय होणार नाही. विरोधक का आणि कशासाठी एवढी उठाठेव करत आहेत हे न  समजण्याइतपत आम्ही नक्कीच खुळे नाहीत असा हल्ला कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केला.

नागवडे साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागवडे पुढे म्हणाले की , नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना केशव मगर यांनी कधीच बारकाईने लक्ष दिले नाही. त्यांना आता सत्तेची स्वप्न पडू लागल्याने  बेछूट आरोप सुरू केले आहेत.त्यांनी केलेल्या आरोपावर  आमची बापूंच्या पुतळ्यासमोर आमने सामने येण्याची तयारी आहे आरोप सिद्ध झाले तर कारखान्याच्या  निवडणूकीतून बाहेर पडू अशी भूमिका जाहिर केली.

नागवडे कारखान्याचे राज्यात आगळे वेगळे नाव आहे  बापुंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारखान्यात  निर्णय होतात. केशव मगर आण्णासाहेब शेलार व आमच्यामध्ये कुठलाही वाद झालेला नाही. पण ते बाहेर गेले कि आरोप प्रत्यारोप करतात. हे चुकीचे आहे.  कारखान्याला अ वर्ग ऑडीटचा दर्जा मिळाला असून कारखाना लवकरच इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू करणार  आहे.  

कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुभाष शिंदे म्हणाले १३० कोटीचा सहवीज निर्मिती प्रकल्प ९० कोटीत करण्यात आला. टिका टिपणी करणारी मंडळी चांगल्या कारभारात किती भागिदार आहेत हा संशोधनाचा विषय आहे.  शरद खोमणे म्हणाले राजेंद्र नागवडे हे संचालकांना विश्वासात घेतल्याशिवाय साधी वीटही खरेदी करत नाहीत.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर ,सुभाष शिंदे ,अॅड सुनील भोस, श्रीनिवास घाडगे, अरुण पाचपुते, राकेश पाचपुते, अशोक रोडे, विजय कापसे, प्रशांत गोरे, शरद खोमणे, सुनील माने, हेमंत नलगे, राकेश पाचपुते, बंडोपंत रायकर, शिवाजी जगताप, निळकंठ जंगले विश्वनाथ गिरमकर, सचीन कदम, विलास काकडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या