लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे : बाळूमामाचा अवतार असल्याचे
सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनोहरमामा
भोसले (वय ३९, रा. उंदरगाव, ता. करमाळा,
जि. सोलापूर) याला पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व
बारामती तालुका पोलिसांनी सातार्यातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, बारामतीतील शशिकांत सुभाष खरात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीविताची भीती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, गुरुवारी
(दि.९) मनोहर भोसले विरोधात करमाळ्यात महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केली.
यानंतर मनोहर भोसले फरारी होते. पोलिसांना केलेल्या तपासात तो सातार्यात असल्याची
माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व
बारामती तालुका पोलिसांनी सातार्यातून ताब्यात घेतले आहे.
0 टिप्पण्या