अभियंता प्रल्हाद पाठक शासनातर्फे सन्मानित
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव ( प्रतिनिधी ) : राज्य शासनातर्फे राबविण्यात आलेल्या शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्याबद्दल शेवगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावल्याने उपविभागीय अभियंता प्रल्हाद अनंत पाठक यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर - म्हैसकर, सचिव ( बांधकामे ) एस. डी. दशपुते , सचिव ( रस्ते ) सदाशिव साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाला कार्यालयीन सुधारणेबाबतचे सादरीकरण करणेकामी कनिष्ठ अभियंता तुकाराम भिसे व शैलेश साबळे तसेच रामेश्वर राठोड, रवींद्र वनवे, वरिष्ठ लिपिक संजय डांगे, निवृत्त कर्मचारी सुरेश घुले आदींचे विशेष सहकार्य लाभले.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविसकर, कार्यकारी अभियंता के. बी. दंडगव्हाळ यांनी शेवगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या