Ticker

6/Breaking/ticker-posts

अॅट्रासिटीच्या गुन्हयातील आरोपींना तात्काळ अटक करा ; वंचित बहूजन आघाडीचा कुकण्यात रास्ता राओको लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कुकाणा : राष्ट्रवादी काँग्रेस हा अन्याय करणारा जातीयवादी पक्ष असून ज्ञानेश्वर कारखाना हे अन्याय,अत्याचार करणारांचे आश्रयस्थान बनला आहे. अशी टिका वंचित बहूजन आघाडीचे नेते,प्रदेश उपाध्यक्ष  किसन चव्हाण यांनी केली. कुकाणा येथील अॅट्रासिटीच्या गुन्हयातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी  गुरूवारी (दि ९) रोजी सकाळी कुकाणा बसथांबा परिसरात वंचित बहूजन आघाडीच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .वंचितचे नेवासा तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण, शेवगाव तालुकाध्यक्ष पॅरेलाल  शेख ,   विजय गायकवाड,मनसेचे विलास देशमुख  आदींची भाषणे झाली.

 वंचित आघाडीचे नेते  किसन चव्हाण म्हणाले ,देशाच्या जाणत्या राजाने मंत्री भुजबळ यांना जेलमध्ये टाकले पण बाळासाहेब आंबेडकरांनी मंत्री भुजबळ यांना सोडले हा इतिहास राष्ट्रवादीचे नेते विसरले असून कुकाण्यातील आरोपी ज्ञानेश्वर कारखान्याच्या अतिथीगृहात सापडतील . पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर कारखान्यावर बसुन वाटाघाटी करतात  असा  आरोप करुन    समाजावर अन्याय झाल्यास वंचित आघाडी सोबत आहे. सामाजिक सलोखा ठेवण्याचीच आमची भूमिका आहे. असे चव्हाण यांनी सांगितले. 

 यावेळी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना पीडीत कुटंूबियांस न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन  वंचित आघाडीच्या वतीने  देण्यात आले.कायदेशीर असेल ते योग्य होईल असे यावेळी निरीक्षक पोवार यांनी आंदोलनकर्त्यंाना सांगितले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या