लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : देशाचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विकास
कार्यावर पुण्याचे लेखक अशोक टाव्हरे यांनी लिहिलेल्या विकासाचा राजमार्ग या मराठी
व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन नगर येथे माजी नगरसेवक
सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते झाले.
१९७६ पासून नितीन गडकरी यांनी अभाविप, राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ, भाजयुमो, भाजपचे
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य, विरोधी पक्षनेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ते केंद्रातील भूपृष्ठ वाहतूक मंत्री
हा प्रवास लेखक अशोक टाव्हरे यांनी या दोन्ही पुस्तकातून उलगडला आहे. तसेच त्यांनी
देशात केलेल्या सर्व विकासकामांची माहिती देण्यात आली आहे. दोन्ही पुस्तकांना
मंत्री गडकरी यांनी सदिच्छा दिल्या आहेत.
लेखक अशोक टाव्हरे म्हणाले, तत्कालीन
खासदार दिलीप गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नगर -
मनमाड व नगर - औरंगाबाद व पुणे - नगर या महामार्गांचे, उड्डाणपुलाची
व नगर जिल्ह्यातील अनेक रस्ते विकासाची अनेक कामे मंजूर केली आहेत. आज ते सर्व
कामे प्रगतीपथावर आहेत. मंत्री नितीन गडकरी व स्व. दिलीप गांधी यांचे खूप
जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या पश्चात माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी त्यांचे
कार्य पुढे नेत आहेत.
सुवेंद्र गांधी म्हणाले, केंद्रीय
भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांचे खूप महान कार्य आहे. संपूर्ण देशाचा ते कायापालट
करत आहेत. त्यांचे विकासाचे महान कार्य लेखक अशोक टाव्हरे यांनी विकासाचा राजमार्ग
या पुस्तकांमधून मांडले आहे. अशोक टाव्हरे यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
0 टिप्पण्या