Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक: पुण्यात २ आंतरराष्ट्रीय बुकींना बेड्या; बेटिंगचा पैसा हवालात !

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणे : केल्यानंतर बेटिंगचा मोठा बाजार समोर आला आहे. बेटिंगमधून आलेला पैसा हवाला रॅकेट व सोन्याच्या देवाणघेवाणीचे व्यवहारासाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दोन बुकींच्या संपर्कात असलेले बुकी पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

गणेश भिवराज भुतडा(वय ५०, रा. त्रिमूर्ती सोसायटी, रस्ता पेठ) आणि अशोक भवरलाल जैन   (वय ४६, रा. हाईड पार्क, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध समर्थ व मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून ९३ लाख ४२ हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे. यातील ९२ लाखांची रोकड भुतडाकडे मिळाली आहे. भुतड याचा कंन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तर, जैन याचा इलेक्ट्रीकचा व्यवसाय आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिली.

 पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना बेटींगबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. दुबई येथील आबुधाबीमध्ये सुरू असलेल्या चेन्नई सूपर किंग आणि कोलकत्ता नाईट राईडर्स यांच्यातील आयपीएल मॅचवर हे दोघे बेटींग घेत होते. पथकाने रास्ता पेठ व मार्केटयार्ड येथे एकाचवेळी ही कारवाई केली. हे दोघे बुकी क्रिकेट लाइन गुरु, बेटवेअर, क्रिकेट एक्सचेंज या अॅपव्दारे मोठ्या प्रमाणावर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या