लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
घोडेगाव: नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात
शनिवारी झालेल्या कांदा लिलावात भाव कमी झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत
आहे. दोन दिवसांपूर्वी घोडेगाव कांदा मार्केट मध्ये लिलावामध्ये कांद्याने चांगला
भाव खाल्ला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र
आवकही वाढ्ल्याने पुन्हा भाव पड्ले.
अधिच्या
लिलावात २७०० च्या आसपास भाव गेले होते. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण
झाले होते. आता कांद्याला निश्चितच भाव येईल असेच सर्वाना वाटत होते. पितरपाटात
कांद्याला नक्की भाव येत असतो. दरवर्षी शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अनेक शेतकऱ्यांनी
आपापले अनुभव सांगितले.
आता
कांदा ४०ते ५० पर्यंत जाईल असे वाटत असतानांच शनिवारी घोडेगाव मध्ये कांद्या
लिलावात शेतकऱ्यांची निराशा झाली. कांदा भाव वाढीचा आनंद जास्त दिवस टिकला नाही.
सरासरी १५००ते १८०० पर्यंत कांदा भाव निघाले आहेत. काही वक्कलच दोन हजारांपर्यंत
गेले आहेत. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात कांदा मार्केट
मध्ये आलेला होता. पुन्हा कांदा घसरला आहे. भाव कमी झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी
व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या