Ticker

6/Breaking/ticker-posts

विजय औटींनी १५ वर्षाची विकासाची परंपरा कायम ठेवली - काशिनाथ दाते

 *देवीभोयरे येथे विजय औटींच्या हस्ते ३० लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजनलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पारनेर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्यांना  माजी आमदार विजय औटी यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत, विजय औटींनी १५ वर्षाची विकासाची परंपरा कायम ठेवली असून ती अशीच पुढे चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु अशी ग्वाही जि. प.च्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यानी दिली.

 तालुक्यातील देवीभोयरे येथे तब्बल ३० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दाते बोलत होते, शिवसेना उप जिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहोकले, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष येवले,किसन सुपेकर,गणप्रमुख मंगेश सालके आदी उपस्थित होते. अहमदनगर जि.प. जिल्हा वार्षिक योजना ३०५४ अंतर्गत, देवीभोयरे ते माळवाडी, सरडे वस्ती रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे - १५ लक्ष रु. व देवीभोयरे ते तुकाई वस्ती मगरदरा ,गाडेवस्ती रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे - १५ लक्ष रु.आदी कामांचा यात समावेश आहे.

 यावेळी काशिनाथ दाते पुढे म्हणाले,अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे सर्व शक्य झाले.राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या माध्यमातुन मला जिल्हापरीषदेच्या बांधकाम व कृषी समीतीवर कामाची संधी मिळाली त्या संधीचे सोने करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे .दुर्दैवाने कोरोनाने आपल्याला गेल्या दोन वर्षापासून नामोहरण केले आहे..त्यामुळे विकास कामांना निधी अपुरा पडतोय. पुढील काळातही विकास कामांना गती देणार असल्याचे सांगीतले. तालुक्यामधे सध्या विजय औटी व आपल्या माध्यमातुन १०० कोटी पेक्षा जास्त कामे झाली आहेत. आगामी काळामधेही तालुक्यामधे मोठ्या प्रमाणात विकासकामे आपण करणार आहोत. कुणाला काय म्हणायचे ते म्हणुद्या आपण फक्त विकासच करायचा असेही सभापती दाते म्हणाले.

 यावेळी पारनेर पं.स.सदस्य डाॅ.श्रीकांत पठारे, माजी सदस्य सुभाष बेलोटे,विश्वनाथ गाजरे,माजी उपसरपंच विकास सावंत, दत्तात्रय बेलोटे,विश्वनाथ गाजरे, बाबुराव मुळे,रामदास मुळे, गोपीचंद बेलोटे,चेअरमन तुकाराम बेलोटे,सिताराम आरोटे , माजी पंचायत समिती सदस्य सुभाष बेलोटे ,शिवाजी बेलोटे,ज्ञानदेव बेलोटे,संतोष केदारी,शरद बोरुडे,आदिक गजरे,रावसाहेब वाढवणे,संपत तिकोणे,जगन्नाथ बेलोटे,रामदास बेलोटे,शंकर सरडे,सुलोचना वाढवणे,शीतल बेलोटे,बाबुराव मुळे,दत्तात्रय बेलोटे,अण्णा मुळे,विजय मुळे,सीताराम आरोटे, विष्णू मुळे, रवींद्र गाजरे,बबन मुळे, रामकृष्ण जाधव, संतोष जाधव, प्रमोद मोरे, भाऊ सरडे, भाऊसाहेब बेलोटे, बाळासाहेब बेलोटे, मंगेश मुळे, नारायण माळी, संजय बेलोटे, किरण बेलोटे, संतोष सरडे, ज्ञानदेव सरडे, दिनेश चौधरी, दिनेश गायकवाड, सचिन श्रीमंदिलकर, मच्छिंद्र पुरी, नरेंद्र बेलोटे, सुलतान शेख, बाबा मणियार, बाळू मंडले,नामदेव पुरी, अनिल बेलोटे,काशिनाथ मोरे,अरुण मुळे, विलास बेलोटे, अण्णा धोत्रे, बाळू मावळे,संभाजी बेलोटे,भानुदास केदारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या