लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगरः रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा
युक्तिवाद पूर्ण झाला. यावर न्यायालय मंगळवारी (७ सप्टेंबर) आपला निर्णय देणार
आहे. या खटल्यातील सरकारी वकिल अॅड. उमेशचंद्र यादव यांनी गेल्या आठवड्यातच
युक्तिवाद केला होता. शुक्रवारी बोठेचे वकिल अॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद
केला. जरे यांना मारण्याचा बोठेचा कोणताही उद्देश दिसून येत नाही. पोलिसांनी
बोठेविरूद्ध घाईघाईने प्रक्रिया राबविल्याचा आरोपही तवले यांनी केला.
बदनामी
होण्याच्या भीतीमुळे बोठेने जरे यांचा सुपारी देऊन खून केल्याचा आरोप आहे. यामध्ये
बोठे अटकेत असून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झालेले आहे. या
गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बोठेतर्फे जिल्हा न्यायालयात गेल्या महिन्यात अर्ज
करण्यात आला आहे. यामध्ये सरकारी वकील यादव यांनी पूर्वीच युक्तिवाद केला आहे.
आरोपीच्या वकिलांनी यासाठी मुदत मागवून घेतली होती. अखेर आज त्यांनी युक्तिवाद
केला. अॅड. महेश तवले यांनी बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की, बोठेचा जरे
यांना मारण्याचा उद्देश नव्हता. पोलिसांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून बोठे याला
आरोपी घोषित केले आहे. या खटल्यात पोलिसांनी खूपच घाई केल्याचे दिसून येते.
सामान्यपणे गुन्हे दाखल झाल्यावर आरोपीला फरार घोषित करण्याची प्रक्रिया पोलिस
एवढ्या जलद गतीने राबवत नाहीत.
0 टिप्पण्या