Ticker

6/Breaking/ticker-posts

पंजशीरमध्ये पुन्हा संघर्ष; तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ला झाल्याचा दावा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यात पुन्हा एकदा तालिबान आणि अहमद मसूद यांच्या नेतृत्वातील रेझिस्टन्स फोर्समध्ये भीषण संघर्ष सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. पंजशीरच्या डोंगर-दऱ्यांमध्ये असलेल्या बंडखोरांनी सोमवारी रात्री तालिबानच्या ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान तालिबानच्या ठिकाणांवर अज्ञात विमानांनी हवाई हल्ला केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप दुजोरा देण्यात आला नाही.

अहमद मसूद समर्थक पंजशीरचे उपराज्यपाल कबीर वासिक यांनी म्हटले की, पंजशीर आणि अंदराबमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. मसूदच्या नॅशनल रेझिस्टन्स फोर्सच्या हल्ल्यात तालिबानचे मोठे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे तालिबानी सैन्य मोठ्या संख्येने पंजशीर आणि अंदराबच्या रस्त्यांवर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हवाई हल्ला केला कोणी?

तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला. हा हवाई हल्ला अफगाण हवाई दलाच्या पायलटने केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेकजणांनी ताजिकिस्तान, उज्बेकिस्तानमध्ये पलायन केले होते. मात्र, हवाई हल्ल्याच्या दाव्याला कोणीही दुजोरा दिला नाही. तर, दुसरीकडे स्थानिकांनी पंजशीरमध्ये तीन लढाऊ विमाने दिसली असल्याचे म्हटले.

पंजशीरवर ताबा; तालिबानचा दावा

तालिबानने पंजशीरची राजधानी बाजारकचाही ताबा घेतला असल्याचे म्हटले होते. तालिबानने पंजशीरमधील सर्व जिल्ह्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा तालिबान प्रवक्ते बिलाल करिमीने केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या