Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांचे रुग्णालयांना ' ऑडिट ' चे आवाहन

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात असला तरी करोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. अशी परिस्थिती असताना आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही जवळ येऊ लागला आहे. हे लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रुग्णालयांना महत्वाचे आवाहन केले आहे. आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहे, असे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

'तर आपण करोनाच्या संकटातून कधीच बाहेर येणार नाही'

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या माझा डॉक्टरया ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल उद्घाटन झाले, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. आजच्या शिक्षणदिनी शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून कोरोनाने आपल्याला जे धडे शिकवले त्यातून आपण काय शिकलो याचा विचार करून या संकटाचा बिमोड करायचा आहे. प्रत्येक पाऊल सावधानतेने आपण टाकतो आहे. ही सगळी काळजी घेतांना अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई आहे. पण आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही गरज आहे. ती घेतली नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेरच पडणार नाही. यामुळे कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता वाढू शकते. तसे होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या