Ticker

6/Breaking/ticker-posts

1 ऑक्टोबरपासून ‘या’ तीन बँकांचे चेकबुक होणार बंद..!

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : येत्या 1 ऑक्टोबरपासून तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर (MICR) कोड अवैध ठरणार आहे. या बँकांमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India) आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank) यांचा समावेश आहे. 


1  एप्रिल 2020 रोजी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत (PNB) विलीनीकरण झाले आहे. आता ग्राहकापासून दोन्ही बँकांच्या शाखेपर्यंत सर्वकाही पीएनबीचे आहे. तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहे.

इंडियन बँकेने अलीकडेच एका ट्वीटमध्ये माहिती दिली होती की, अलाहाबाद बँकेचे पूर्वीचे MICR कोड आणि चेकबुक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असतील. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांनी 1 ऑक्टोबर 2021 पूर्वी नवीन चेक बुक घ्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या