Ticker

6/Breaking/ticker-posts

खबरदार! भारताकडं वाकड्या नजरेनं पहाल तर सडेतोड उत्तर देऊ; CDS बिपीन रावत

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यानंतर आता भारतीय लष्कराकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. भारताकडे वाकड्या नजरेने पहाल तर सडेतोड उत्तर देऊ असा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी तालिबान्यांना दिला आहे. भविष्यात अफगाणिस्तानमधून भारतीय भूमीत करण्यात येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हालचालींना उत्तर देण्याची तयारी भारतीय लष्कराने केली असल्याचं ते म्हणाले. 

आम्ही आधीपासूनच तालिबानच्या वर्चस्वाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याच आधारावर काही आपात्कालीन योजनाही बनवण्यात आल्या. हे तेच २० वर्षांपूर्वीचं जुनं तालिबान आहे, आता केवळ त्यांचे सहकारी बदलले आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानात सत्ता बळाकवल्यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी समस्यांशी दोन हात करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं भारताचे 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' बिपीन रावत यांनी म्हटलंय.

प्रश्न अफगाणिस्तानचा

दिल्लीत ''इंडिया यूएस पार्टनरशिप - सेक्युरिंग ट्वेन्टी फर्स्ट सेन्चुरी' चर्चेदरम्यान सरसेनाप्रमुख (Chief of Defense Staff) बिपीन रावत बोलत होते. अफगाणिस्तान लष्कराला नमवून एकही गोळी न झाडता राजधानी काबूलसहीत अफगाणिस्तानातील बहुतांश भागावर आपला कब्जा करणाऱ्या तालिबानमुळे शेजारील राज्यांच्या चिंतेत वाढ जालीय. अफगाणिस्तानातून येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या आणि फोटो जगाला हादरा देणारे ठरत आहेत. या परिस्थितीशी कसं लढायचं या प्रश्नावर अनेक देश विचार करत आहेत. याच प्रश्नावर बिपीन रावत यांनी आपले विचार मांडले.

'समस्येशी दोन हात करणार'

सहकार्यानं दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली किंवा दहशतवादाविरोधात लढाईत काही गुप्त माहिती मिळाली तर याचं स्वागत होईल, असंही बिपीन रावत यांनी म्हटलंय. राहीला प्रश्न अफगाणिस्तानचा तर भारताकडे वाटचाल करणाऱ्या कोणत्याही समस्येशी आम्ही त्याच पद्धतीनं दोन हात करू ज्या पद्धतीनं आम्ही भारतात दहशतवादाशी लढतो, असंही यावेळी बिपीन रावत यांनी म्हटलंय.

'इंडो पॅसिफिक - अफगाण स्थिती एकसारखी नाही'
हिंद प्रशांत आणि अफगाण स्थितीकडे एकाच दृष्टीने पाहिलं जाऊ नये, असं मला वातं. हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. दोन्ही क्षेत्रात सुरक्षेसाठी बरीच आव्हानं आहेत परंतु, ते दोन वेगवेगळ्या स्तरांवर आहेत. या दोन समांतर रेषा एकत्रित येणं शक्य नाही, असंही यावेळी रावत यांनी म्हटलंय.

आपल्या केवळ उत्तरेकडील नाही तरी पश्चिमी शेजारील राष्ट्रांकडेही आण्विक शस्त्र प्रणाली उपलब्ध आहेत. आपण अशा शेजाऱ्यांकडून घेरलेलो आहोत जे या आधुनिक हत्यारांसहीत सुसज्ज आहेत, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या