Ticker

6/Breaking/ticker-posts

औरंगाबादेत वीज अधिकाऱ्यांला तिघांनी चोपले..

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

औरंगाबाद : थकीत वीज बिल वसुलीबाबत कर्तव्य करत असलेल्या महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना तिघांनी मारहाण केल्याच्या दोन घटना गुरुवारी दुपारी अंबरहिल आणि माळीवाडा भागात घडल्या. विठ्ठल तुकाराम औताडे (वय २२, रा. हरिओमनगर), भारत साहेबराव शेजवळ (वय २८) आणि शरद अनिल लोखंडे (वय ३०, दोघेही रा. माळीवाडा) अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरण कंपनीचे सहायक अभियंता संतोष गिरजाबा सुर्वे (वय ४३) हे दुपारी थकबाकीदारांकडे वसूलीसाठी गेले होते. सुर्वे हे अंबरहिलकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या औताडे याने, शिवीगाळ सुरू केली. तसेच सुर्वे यांच्या दुचाकीची चावी काढून घेत मारहाण केली. याशिवाय वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केल्यावरच दुचाकीची चावी देतो असे म्हणत वाद घातला. या प्रकरणी सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन औताडेविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत वीज महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कारभारी वाघमारे (य ३१) आणि दुर्योधन नारनवरे असे दोघे माळीवाडा परिसरात थकीत वीज बिल वसुलीचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना, भारत शेजवळ आणि शरद लोखंडे या दोघांनी मारहाण करुन धक्काबुक्की केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरुन दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या