Ticker

6/Breaking/ticker-posts

पेट्रोल पंपावर दरोडा, कुणी पाठलाग करू नये म्हणून चोरट्यांनी लढ्विली 'ही' शक्कल..

 *नगर-सोलापूर रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा

*चोरट्यांनी पळवली दोन लाखांची रोकड

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: काम कोनतही असो त्यात नव-नवीन कल्प्ना अमलात आणाव्या लागतात, मग ते चोरी दरोड्याचे काव का असत नाही, असाच प्रकार नुकताच अनुभवायला आला. नगर-सोलापूर रोडवर दहिगाव साकत गावाजवळील पेट्रोल पंपावर रविवारी पहाटे दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. सुमारे दोन लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप दरोडेखोरांचा शोध लागला नाही.

सोलापूर महामार्गावर नगर तालुक्यात दहीगाव शिवारात भारत पेट्रोलियम कंपनीचा हा केतन पेट्रोल पंप आहे. रात्री तेथे वर्दळ कमी असते. महामार्गालगत असल्याने अवजड वाहनेही इंधन भरण्यासाठी थांबत असल्याने रात्रभर पंप सुरू असतो. रविवारी पहाटे अडीच-तीनच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोर तेथे आले. त्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखविला. त्यांना मारहाणही केली. यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर दरोडेखोर पंपावरील दीड ते दोन लखांची रोकड घेऊन पळून गेले. त्यावेळी पंपावर आलेल्या काही ग्राहकांनाही दरोडेखोरांनी धमकावले. कोणी पाठलाग करून नये, यासाठी पंपावरील वाहनांच्या चाव्या घेऊन दरोडेखोर पळून गेले.
याची माहिती नगर तालुका पोलिसांना कळविण्यात आली.

तालुका पोलिस घटनास्थळी गेले. नगरहून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र
, त्यात यश आले नव्हते. जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही तपास सुरू केला आहे. करोना लॉकडाउननंतर बऱ्याच दिवसांनी पेट्रोलपंप लुटीची घटना घडली आहे. पूर्वी जिल्ह्यात अशा घटना वारंवार होत होत्या. मधल्या काळात त्या कमी झाल्या होत्या. आता पुन्हा ही घटना घडल्याने पोलिसही सावध झाले आहेत. पेट्रोलपंपावरील डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढल्याने आता पूर्वीप्रमाणे जास्तीची रोकड पंपावर नसते. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही बहुतांश व्यवहार रोखीने होत असल्याचे दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या