Ticker

6/Breaking/ticker-posts

पिंपरीत अघोरी प्रकार, पत्नीला विद्रूप करण्यासाठी पतीने केलं भयंकर कृत्य

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पिंपरी चिंचवड : करोनाच्या भीषण काळात प्रत्येकानेच आपलं मानसिक संतुलन गमावलं. यामुळे अनेक कौटुंबिक वाद, पती-पत्नीमध्ये वाद, नात्यांमध्ये दुरावा अशा अनेक घटना आपण या काळात पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आला आहे. घरात झालेल्या शुल्लक वादावरून पत्नी संसार करण्यासाठी तयार नव्हती. याच रागातून पतीने भयंकर कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीला मारहाण केली आणि तिच्यासोबत एक भयंकर प्रकार केला. तिला विद्रूप करण्यासाठी पतीने चक्क तिचे केस कापले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे, मिळालेल्या माहितीनुसार, पतीकडून सतत अत्याचार होत असल्याची तक्रार पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. तेव्हा पोलिसांनी तिची खिल्ली उडवल्याचा गंभीर प्रकार समोर आला.

यानंतर पतीला आणखी भयंकर कृत्य करण्यास बळ मिळालं आणि अशाच वादातून पुढे त्याने पत्नीला विद्रूप करण्याच्या उद्देशाने तिचे सुंदर केस कापले. ही घटना कालच्या सुमारास घडली. अमृता उर्फ कोमल असं घटनेतील पीडितेचे नावे आहे. कोमलने पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, पती रोज दारू पिऊन तिला मारहाण करायचा.

गेल्या दोन वर्षापासून ती तिच्या आईकडे राहत होती. पतीच्या जाचाला कंटाळून तिला संसार करायचा नाही असं ती सतत म्हणत होती. पण तरीदेखील पतीने तिला ओढत घरी नेलं आणि मारहाण केली. यातूनच तिला विद्रुप करायच्या हेतूने तिचे केसही कापले. या घडलेल्या प्रकारासंदर्भात कोमलने पुन्हा एकदा पोलिसांकडे तक्रार दिली यावेळी पोलीस एका कर्मचार्‍याचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये गुंतलेले होते असंही कोमलने सांगितलं.

दरम्यान, या घटनेची पोलीस तक्रार केली असून पोलीस आरोपी पतीवर कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड येथे वारंवार धक्कादायक प्रकार समोर येत असतात. त्यामुळे शहरात गुंडगिरीही वाढल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या सगळ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. या घटनेनंतर तरी पिंपरी-चिंचवड पोलिसांना जाग येणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या