लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बीड
:करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये
शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, बीड जिल्ह्यात रुग्णांचा
पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथिलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्णवाढीचा
दर कमी व्हावा, यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच
नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्रीआष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यांत बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यावर उपाय म्हणून
पोलिस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे
जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात
यावा, तसेच याची अंमलबजावणी शनिवारपासूनच करावी, असे निर्देश मुंडे यांनी या वेळी जिल्हा प्रशासनाला दिले.
करोनाचा प्रादुर्भाव आणि लसीकरणाबाबत
जिल्हास्तरीय आढावा बैठकीमध्ये त्यांनी वरील सूचना केल्या. या बैठकीसाठी आमदार
संदीप क्षीरसागर, आमदार
बाळासाहेब आजबे, प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलिस
अधीक्षक आर. राजा, अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
राधाकिसन पवार, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता
डॉ. शिवाजी सुक्रे, यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित
होते.
जिल्ह्यातील
आरोग्य व प्रशासन यंत्रणांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे.
जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, औषधे,
इंजेक्शन, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व
सुसज्जता ठेवण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
आणखी ऑक्सिजन निर्मिती
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, 'जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालय
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय आणि लोखंडी सावरगाव येथील महिला रुग्णालय येथे
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहेत. जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता
वाढविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय यासह कोव्हिड रुग्णालयांमध्ये
आणखी ऑक्सिजन निर्मिती क्षमता प्रस्तावित करण्यात आली आहे.'
0 टिप्पण्या