Ticker

6/Breaking/ticker-posts

ज्ञानेश्वर दौंड राज्यस्तरीय कृषी पुरस्काराने सन्मानित

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : कृषी आयुक्त महाराष्ट्र शासन यांचेकडून ज्ञानेश्वर दौंड यांना कृषी संजीवनी मोहीम 2021 अंतर्गत उल्लेखनीय काम Tगिरी केल्याबद्दल ,प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

 ज्ञानेश्वर दौंड हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कृषी सहाय्यक पदावर येळी ता पाथर्डी येथे कार्यरत आहेत.

सन 2021 मध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी असताना  कोरोनाची दुसरी लाट आली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी दौंड यांनी मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले . त्याअंतर्गत कृषी शास्त्रज्ञ व तज्ञ मार्गदर्शक यांची प्रशिक्षणे आयोजित केली. मुख्यत्वे ऊस ,कापूस, तूर ,मूग ,उडीद, सोयाबीन इत्यादी पिकांची पेरणी पासून विक्रीपर्यंतची व्यवस्था  व उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान याविषयीची प्रशिक्षणे मोबाईल द्वारे शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला त्याचा त्यांना खूप मोठा फायदा झाला. पेरणीच्या वेळी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया याबाबतची माहिती, बी.बी.एफ.यंत्राच्या साह्याने पेरणी कशी करावी ही सर्व माहितीचे व्हिडिओ करून ते युट्युब चॅनल ,व्हाट्सअप वर फेसबुक द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचविले. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर करावा, रासायनिक खतांचा दहा टक्के कमी वापर करावा यासाठी गावोगावी जाऊन शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली.

 कापसाची लागवड करत असताना एका गावामध्ये एकच वाण लावल्यामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे सांगितले. विकेल ते पिकेल अंतर्गत चांगले कामकाज केले. रिसोर्स पर्सन म्हणून येळो येथील संतोष गर्जे या शेतकऱ्यांची निवड केली .त्यांनी केलेली सेंद्रिय शेती ,सेंद्रिय खते व जैविक कीटकनाशके तयार करण्याची पध्दती व महिती याचा व्हिडिओ तयार करून तो यूट्यूब चैनल च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला ,त्याला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून कृषी विद्यापीठाच्या व कृषी विभागाच्या वेगवेगळ्या पिकांच्या महिती असलेल्या पी.पी. टी. कमी वेळात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे चांगले कार्य केले. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कीटकनाशकाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांमध्ये पीक स्पर्धा निर्माण केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणारा कृषी सहाय्यक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे व्हाट्सअप ,फेसबुक ,यूट्यूब चैनल च्या माध्यमातून छोटे छोटे व्हिडिओ, माहितीपत्रके, पिकाबद्दलची माहिती इत्यादी प्रचार प्रसिद्धी चे कामकाज त्यांनी उत्कृष्ट पणे केले. परिघाच्या बाहेर जाऊन अतिरिक्त काम करणे ही त्यांची खरी ओळख आहे.

 शेतकऱ्यांना आपण एखादी माहिती सांगण्यापूर्वी किंवा नवीन अभिनव पद्धत अमलात आणण्यापूर्वी त्यांनी त्या पद्धतीचा स्वतः प्रयोग करून पाहिले. तूर, मूग,उडीद ,कापूस इत्यादी पिकामध्ये त्यांनी लागवडी मधील अंतर  वेगवेगळ्या प्लॉटवर वेगवेगळी अंतर ठेवून विविध प्रयोग केले. काटेवाडी येथील जवळपास पंधरा एकर क्षेत्रावर जणू त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रयोगशाळाच निर्माण केली. कापसाची जोड ओळ पद्धतीने लागवड करून एकरी पंधरा हजार झाडे बसतील याचे नियोजन केले. कापसमामध्ये सापळा पिकाची लागवड केली.या सर्व अभिनव उपक्रमास मा. रामदास मडके ,मंडल कृषी अधिकारी टाकळीमानुर . मा.प्रवीण भोर, तालुका कृषी अधिकारी पाथर्डी. मा.गहीनीनाथ कापसे,उपविभागीय कृषी अधिकारी अहमदनगर .यांनी वेळोवेळी भेटी देऊन पाहणी केली व केलेल्या कामाचे कौतुक केले.

 "ज्ञानेश्वर दौंड यांनी शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.- रामदास मडके, कृषी  मंडल अधिकारी, टाकळी मानूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या