Ticker

6/Breaking/ticker-posts

शेती करावी तर अशी...मक्याच्या शेतात १०० किलोचा गांजा; पोलिसांनी धाड टाकताच...

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

साताराः जिल्ह्यातील म्हसवड पोलिसांनी माण तालुक्यातील धामणी गावातील शेतकर्‍याने शेतात लावलेल्या २८५ गांजाची झाडे जप्त केली. त्याची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शेतकरी बबन भिवा खाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

१० गुंठे शेतात मका पिकामध्ये गांजाची झाडे पिकवण्यात आली होती. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावलं उचलत कारवाई केली आहे. सातारा जिल्ह्यातील धामणी (ता. माण) येथील शेतकरी बबन भिवा खाडे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर होलार नावाच्या शिवारात १० गुंठ्यात मका पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याची माहिती म्हसवड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत बाजीराव ढेकले यांनी डीवायएसपी डॉ. नीलेश देशमुख यांना तातडीने माहिती देऊन धामणी येथील शेतकरी बबन भिवा खाडे यांच्या होलार नावाच्या शिवारात म्हसवड पोलिसांची टीम घेऊन तपास करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी डॉ. नीलेश देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतात शोध घेण्यास सुरुवात केली असता मक्याच्या पिकात २८५ गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे वजन १०० किलो आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या