Ticker

6/Breaking/ticker-posts

हिशेब चुकता करण्याचे भाजपचे संकेत; अनिल परबांना करणार लक्ष्य ?

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, परिवहनमंत्री अनिल परब हे केंद्रातील मोदी सरकारच्या रडारवर येण्याची चिन्हे आहेत. कुरघोडीच्या खेळात अनिल देशमुखांपाठोपाठ अनिल परब यांच्यावरही गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 भाजप मुख्यालयात मंगळवारी राणे यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या अटकेच्या कारवाईचा निषेध करताना, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी अनिल देशमुख आणि अनिल परब यांचा विशेष उल्लेख केला. ' अनिल देशमुख असो वा अनिल परब, जे चुकीच्या पद्धतीने इतरांसाठी खड्डा खणतात, त्या खड्ड्यात ते स्वतःच पडतात, हा जगाचा नियम आहे. अनिल परब यांच्या विभागात कशाप्रकारची वसुली आणि घोटाळे सुरू आहेत, याची तक्रार त्यांच्याच विभागाच्या लोकांनी केली आहे. राज्य सरकारने त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत आजवर काही कारवाई केली का? त्यांना आतापर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अनिल देशमुखांची अटक टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागत आहे. ज्यांनी चुका केल्या त्यांना वाचवावे लागते यामागे महाराष्ट्र सरकारची कोणती मजबुरी आहे? इतरांना अटक करून महाविकास आघाडीचे सरकार आपला चेहरा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे,' असा आरोप पात्रा यांनी केला.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अन्वय नाईकप्रकरणी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेच्या घटनाक्रमानंतर अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांना गृहमंत्रिपद गमवावे लागले होते. राणे यांच्या अटकेचा हिशेब चुकविण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारकडून मुख्यमंत्री ठाकरे यांचे विश्वासू मंत्री अनिल परब यांनाच लक्ष्य केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून परब यांच्यावर होणारी संभाव्य कारवाई म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरच हल्ला ठरेल, असे म्हटले जात आहे

णे यांची अटक हे गंभीर प्रकरण असून चिंतेचा विषय आहे. एकप्रकारे ही लोकशाहीची हत्या आहे. महाराष्ट्रातील सरकार ज्या सूडबुद्धीच्या भावनेने राजकारण करीत आहे, ते देशातील जनता बघत आहे आणि देशातील जनता त्याचे उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या वतीने पात्रा यांनी दिली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या