*महाराष्ट्रातून
कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला करोना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा.
*यामुळे
होतेय सीमा भागातील नागरिकांची मोठी कुचंबना .
*ही सक्ती
कर्नाटक सरकारने तातडीने बंद करावी- शिवसेना आणि राष्ट्रवादीची मागणी
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या
प्रत्येकाला करोना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा केल्याने सीमा भागातील नागरिकांची मोठी
कुचंबना होत आहे, ही सक्ती
कर्नाटक सरकारने तातडीने बंद करावी म्हणून शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही
आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको आंदोलन केले. टोल नाक्यावरील तपासणी बंद न केल्यास
नाका फोडण्याचा इशारा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दिला आहे.
पुणे-बेंगलोर
महामार्गावरून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची कोगनोळी टोल नाक्यावर तपासणी
केली जात आहे. त्यासाठी कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. महामार्गावरून
कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची व व्यक्तीची तपासणी केली जाते. दोन
डोस किंवा 72 तासातील करोनाचा rt-pcr चा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय कोणालाही कर्नाटकात सोडले जात नाही.
यामुळे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या अनेकांची कुचंबणा सुरू झाली आहे.
दरम्यान
, महाराष्ट्रातील वाहने कर्नाटकात
सोडण्यात अडथळा आणल्यास कर्नाटकातील वाहने महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा
इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. गुरुवारी कर्नाटकचा नाका फोडण्याचा शिवसेनेने
दिलेला इशारा आणि राष्ट्रवादीने आज दिलेला इशारा यामुळे सीमा नाक्यावर तणाव
निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने
कर्नाटक राज्यातील प्रशासनाशी संवाद साधून याबाबत तोडगा काढण्याची विनंती कागल
पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने
केलेल्या आंदोलनात संजय चितारी संजय ठाणेकर सुनील माळी यांच्यासह अनेक
कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
0 टिप्पण्या